Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : ज्येष्ठांसाठी जिल्हानिहाय अधिकारी नेमावा : ‘गोवा कॅन’

Panaji News : बॅकेत ज्येष्ठ नागरिकांना चांगली सेवा देण्याची सूचना केली जावी. १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान ज्येष्ठ नागरिक अधिकार जागृती पंधरवडा साजरा करावा, अशा मागण्‍याही यावेळी करण्यात आल्‍या.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू असलेल्या सुविधा, सवलती त्‍यांना दिल्या जातात की नाही, याची पडताळणी करण्यासाठी जिल्हानिहाय अधिकारी नेमावा अशी मागणी ‘गोवा कॅन’ या संस्थेने समाजकल्याण संचालक अजित पंचवाडकर यांची भेट घेऊन केली.

संस्थेच्या शिष्टमंडळाने संचालकांची भेट घेऊन ज्येष्ठ नागरिकांना भेडसावत असलेल्या अनेक समस्‍यांवर चर्चा केली.

संस्थेचे रोलंड मार्टिन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागिकांसाठी सार्वजनिक शौचालये खास पद्धतीने बांधली गेली पाहिजेत याकडे संचालकांचे लक्ष वेधले. बसमध्ये त्‍यांच्‍यासाठी आरक्षित आसनांच्या संख्येत २ वरून ५ पर्यंत वाढ केली पाहिजे.

दिव्यांग, नंतर ज्येष्ठ नागरिक शेवटी इतर सर्व या पद्धतीने बसमध्ये प्रवासी चढण्याचा क्रम ठरवला पाहिजे. ‘उमीद’ केंद्रांच्या संख्येत वाढ करावी. बॅकेत ज्येष्ठ नागरिकांना चांगली सेवा देण्याची सूचना केली जावी. १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान ज्येष्ठ नागरिक अधिकार जागृती पंधरवडा साजरा करावा, अशा मागण्‍याही यावेळी करण्यात आल्‍या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT