Crime  Dainik Gomantak
गोवा

Crime News : शिकारीचा डाव पचला? संशयित १६ कदंब कर्मचारी सेवेत रुजू

Crime News : मात्र, संबंधित कर्मचारी हे सहलीसाठी अभयारण्‍यात गेले होते, असा दावा करण्‍यात आला आहे व गुन्हा सिद्ध झालेला नसल्‍याने सर्व कर्मचारी मडगाव डेपोत सेवेत रुजू झाले

गोमन्तक डिजिटल टीम

Crime News :

पणजी, नेत्रावळी अभयारण्यातील साळजिणी येथे शिकारीच्या संशयावरून वन खात्याने अटक केलेल्‍या कदंब महामंडळाच्‍या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्‍यात येईल, असे वनमंत्र्यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

मात्र, संबंधित कर्मचारी हे सहलीसाठी अभयारण्‍यात गेले होते, असा दावा करण्‍यात आला आहे व गुन्हा सिद्ध झालेला नसल्‍याने सर्व कर्मचारी मडगाव डेपोत सेवेत रुजू झाले. दोन खात्‍यांमधील विरोधाभास समोर आल्‍याने संबंधित प्रकरण ‘सेटल’ करण्‍याचा प्रयत्‍न होत असल्‍याची जनभावना निर्माण झाली आहे.

वन खाते याप्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करील असे स्पष्टीकरण देत महामंडळाने जबाबदारी झटकली आहे; वनमंत्र्यांनी यासंदर्भात कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.

वन खात्‍यासमोर संबंधित लोक हे शिकारीसाठी आले होते, हे सिद्ध करण्‍याचे आव्‍हान आहे. त्‍या अनुषंगाने तपासणीस प्रारंभ झाला आहे.

या कर्मचाऱ्यांवरील गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही व हा गुन्हा तसा खासगी स्वरूपाचा आहे. त्यामुळे त्यांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय तात्काळ कारवाई करता येणार नाही. वन खात्याकडून कारवाईबाबतचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही.

- डेरिक नेटो, कदंबचे एमडी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

Mati Bhram Yog: धन हानी अन् नात्यांमध्ये दुरावा! बुध-चंद्र युतीमुळे 3 राशींवर ओढावणार मोठे संकट; गुंतवणूक करताना 100 वेळा विचार करा

Goa Taxi New Fare Rates: गोव्यात टॅक्सी प्रवासाचे नवे दर लवकरच लागू! पहिल्या 3 किमीला 300, 3 ते 8 किमीला 445 रुपये

SCROLL FOR NEXT