Panaji dangerous building demolition Dainik Gomantak
गोवा

पणजीत धोकादायक इमारत जमीनदोस्त, महानगरपालिकेची कारवाई; गेल्या वर्षीच केली होती सीलबंद

Panaji dangerous building demolition: पणजी मार्केट परिसरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या फाल्कन अपार्टमेंटच्या शेजारील तीन मजली असुरक्षित झालेली आणि गतवर्षी २३ मे रोजी सीलबंद केलेली इमारत पाडण्यास सुरुवात झाली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: पणजी मार्केट परिसरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या फाल्कन अपार्टमेंटच्या शेजारील तीन मजली असुरक्षित झालेली आणि गतवर्षी २३ मे रोजी सीलबंद केलेली इमारत पाडण्यास सुरुवात झाली.

महानगरपालिकेने नेमलेल्या खासगी कंत्राटदाराने आज सकाळी ११ वाजता जेसीबीच्या साह्याने इमारतीचे बांधकाम हटवण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोषाख हॉटेलसमोरील रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.

महानगरपालिकेच्या असुरक्षित इमारतींच्या यादीत ही इमारत होती. त्यामुळे गेल्यावर्षी इमारतीच्या तळभागात १३ भाडेकरू दुकानदार होते, त्यांना नोटीस बजावून ही इमारत सील केली होती. त्याचबरोबर हा परिसर पूर्णतः लोकांना ये-जा करण्यास बंद करण्यात आला होता. पावसाळ्यापूर्वी ही धोकादायक इमारत हटवण्याचे काम महानगरपालिकेने हाती घेतल्याचे दिसते.

जेसीबीच्या साह्याने इमारतीच्या भिंती सुरुवातीला हटवण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर शेजारील बंद दुकानेहीही हटवण्यात आली आहेत. बांधकाम पाडण्याचे काम सुरू होणार असल्याने महानगरपालिकेने त्यापूर्वीच शेजारील इमारतीत असणारी फाल्कन इमारत खाली केली आहे.

उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा

बाजाराच्या असुरक्षित इमारतीजवळील गाळेधारकांना मोठा दिलासा देताना, उच्च न्यायालयाने या इमारतीच्या पाडकामाला परवानगी दिली आहे. सर्व गाळ्यांचे नूतनीकरण करून ते पूर्ववत केले जातील, या पणजी महानगरपालिकेने दिलेल्या आश्वासनाची दखल घेऊन न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

पाडकाम पूर्ण झाल्यानंतर, सध्याच्या गाळेधारकांकडेच पुन्हा ताबा सोपवला जाईल, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. तथापि, अशा प्रकारे ताबा परत दिला गेल्याने गाळेधारकांच्या बाजूने कोणताही नवीन हक्क, हितसंबंध किंवा मालकीहक्क निर्माण होणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

अहवालानंतर झाली कारवाई!

महानगरपालिकेने या कारवाईसाठी पालिका अधिनियमा''च्या कलम २७२ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर केला. या कलमानुसार, महापालिकेला असुरक्षित इमारतींमधील रहिवाशांना नोटिसा बजावण्याचा आणि त्यांना इमारतीतून बाहेर काढण्याचा अधिकार प्राप्त होतो.

गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (जीईसी) स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने सादर केलेल्या अहवालात ही इमारत असुरक्षित असल्याचे घोषित केले होते. या अहवालाचा आधार घेत, महानगरपालिकेने १३ भाडेकरूंना बाहेर काढले आणि त्यानंतर इमारत पाडण्याचा निर्णय घेऊन ती सील केली होती. आता ती इमारत पाडण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT