goa police logo Dainik Gomantak
गोवा

Goa Police : गोवा पोलिसांची विश्वासार्हता वेशीवर; पोलिसानेच पुरवली गुन्हेगारांना माहिती

Goa Police : पोलिस अधिकाऱ्यांनी सहकाऱ्यांवर कितपत विश्‍वास ठेवायचा याबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. पोलिस अधिकाऱ्यांचीच माहिती गुन्हेगारांना पुरवण्यात त्याचा सहकारी असल्याने पोलिस खात्यात खळबळ माजली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police :

पणजी, पोलिसच गुन्हेगारांशी हातमिळवणी करू लागल्याने पोलिस खात्याची विश्‍वासार्हताच वेशीवर टांगली गेली आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी सहकाऱ्यांवर कितपत विश्‍वास ठेवायचा याबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. पोलिस अधिकाऱ्यांचीच माहिती गुन्हेगारांना पुरवण्यात त्याचा सहकारी असल्याने पोलिस खात्यात खळबळ माजली आहे. पोलिस स्थानकातील दस्तावेजाची माहिती गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकते याचा पर्दाफाश या प्रकरणाने झाला आहे.

नाव उघड न उघड करण्याच्या अटीवर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही तपासकामासाठी आवश्‍यक असलेली सीडीआर (कॉल डिटेल्स रिकॉर्ड) माहिती पोलिस अधीक्षकाच्या परवानगीशिवाय घेता येत नाही. ही सीडीआर माहिती मोबाईल कंपनीही ‘ट्राय’च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार देते.

एखाद्या खून किंवा अपहरण यासारख्या गंभीर प्रकरणात कंपनीशी वरिष्ठ अधिकारी थेट संपर्क साधून ही सीडीआर माहिती घेऊ शकतात. मात्र ही गुप्त माहिती पोलिस स्थानकाच्या क्षेत्राबाहेर जाणार नाही याची जबाबदारी ही पोलिस स्थानक प्रमुखाची असते. त्यामुळे यापुढे या प्रमुखांना अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास डळमळला

पोलिस स्थानकातील गुप्त माहिती एखाद्या गुन्हेगाराला देण्याच्या प्रकरणामुळे पोलिसांचा सहकाऱ्यांवरील विश्‍वास ठेवण्याबाबत संशय बळावला आहे. अनेकदा वरिष्ठ अधिकारी हाताखालील सहकाऱ्यांच्या कामावर विश्‍वास ठेवून असतात. मात्र त्यांचाही विश्‍वास डळमळू लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

SCROLL FOR NEXT