Panaji Corporation Dainik Gomantak
गोवा

Panaji Corporation : खोदकामांमुळे दोन महिन्‍यांपासून खावी लागतेय धूळ; रायबंदरवासीयांच्‍या नशिबी ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’

Panaji Corporation : श्री महालक्ष्मी मंदिरापासून जवळ असलेल्या व पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या कोकणी कँटीनकडे रस्त्याचे सुरू असलेले काम. काम सुरू असले तरी कँटीनमध्ये येणाऱ्या पर्यटकांचा ओघ काही कमी झालेला नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Corporation :

पणजी महानगरपालिकेचा भाग असलेल्या रायबंदर भागातही मलनि:स्सारण, पदपथ व रस्त्यांची कामे करावयाची आहेत. मागील दोन महिन्यांपासून रस्त्यांच्या खोदकामामुळे तेथील नागरिक त्रास सहन करत आहेत. तेथील कामांमुळे वाहतूक वळविण्यात आली आहे.

श्री महालक्ष्मी मंदिरापासून जवळ असलेल्या व पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या कोकणी कँटीनकडे रस्त्याचे सुरू असलेले काम. काम सुरू असले तरी कँटीनमध्ये येणाऱ्या पर्यटकांचा ओघ काही कमी झालेला नाही.

पाण्‍यासाठी वणवण; टँकरमुळे थोडा दिलासा :

दि. ३० मार्चपर्यंत मुख्य रस्ता बंद ठेवण्‍यात येत असल्‍याचे जाहीर करण्‍यात आले होते. परंतु आता मे महिन्याची २० तारीख आली तरी येथील कामे काही संपलेली नाहीत. दहा-दहा दिवस रायबंदरच्या नागरिकांना पाण्यासाठी त्रास काढावा लागला. अखेर नगरसेवकाला टँकरची सोय करावी लागली. टँकरचे पाणी इतर कामासाठी वापरता येते. पण पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना खासगी विहिरी किंवा पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागल्या.

पाटोवरील भूमिगत खोदकाम बाकी

लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू झाल्याने लोकांची समस्‍या आता काही प्रमाणात सुटली आहे. काही कामे अत्यंत संथगतीने सुरू असल्याची तक्रार येथील नगरसेवकाची आहे.

रस्त्याचे खोदकाम सुरू झाल्यापासून रायबंदरवासीयांना काही ना काही त्रास सहन करावाच लागतोय. रस्त्यावर झालेले खोदकाम बुजवण्याचे काम सुरू आहे. महत्त्वाचे म्‍हणजे रायबंदर पाटोवरील भूमिगत खोदकाम बाकी आहे.

पावसाळ्‍यात पणजी तुंबणार?

येत्या पावसाळ्यात पणजी शहर तुंबणार का? हा प्रश्‍‍न पणजीवासीयांना भेडसावत आहे. गेल्‍या पावसाळ्यानंतर कामांना गती आली खरी, पण अनेक ठिकाणी मलनि:स्सारण वाहिनी टाकण्याचे आणि मेनहोलचे काम सुरू झाले.

त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रकारही घडले. गत महिन्यात एप्रिलमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने स्मार्ट सिटीच्या कामांबाबत अनेक प्रश्‍न निर्माण केले. १८ जून रस्त्यावर ‘बॉम्बे बझार’ परिसरात पाणी साचण्याचा प्रकार नेहमीचा घडत आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT