Global Warming Dainik Gomantak
गोवा

Global Warming : प्रवाळांना बसतोय ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा फटका; संशोधक बबन इंगोले यांचे निरीक्षण

Global Warming : या प्रवाळांचे विरंजन किंवा ब्लीचिंग होत आहे, म्हणजेच ते पांढरे होत आहेत, असे निरीक्षण ज्येष्ठ सागरी संशोधक डॉ. बबन इंगोले यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना नोंदवले.

गोमन्तक डिजिटल टीम

अवित बगळे

Global Warming :

पणजी, गोवा आणि रत्नागिरी किनाऱ्यालगतच्या प्रवाळांना तापमानवाढीचा फटका जाणवू लागला आहे.

या प्रवाळांचे विरंजन किंवा ब्लीचिंग होत आहे, म्हणजेच ते पांढरे होत आहेत, असे निरीक्षण ज्येष्ठ सागरी संशोधक डॉ. बबन इंगोले यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना नोंदवले.

ते म्हणाले, ग्लोबल वॉर्मिंगमुळे सर्वच सजीव सृष्टीवर मोठा परिणाम होत आहे, याला सागरातील जीवसृष्टीही अपवाद नाही. याचेच प्रमुख उदाहरण म्हणजे प्रवाळ फिके पडत जाणे होय.

ते म्हणाले, नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनने (एनओएए) जागतिक प्रवाळ विरंजनाचा चौथा टप्पा सुरू असल्याचे जाहीर केले आहे. हा टप्पा २०२३ च्या प्रारंभापासून सुरू झाल्याचे म्हटले आहे. ‘अल निनो’ मुळे गेल्या जूनपासून तापमान वाढ होत आहे. गत वर्षी ऑगस्टमध्ये तापमानाने सर्व विक्रम मोडीत काढले.

प्रवाळे ही तापमानवाढीचा पृथ्वीवर, निसर्गावर होणाऱ्या परिणामांची पूर्वसूचना देणारी यंत्रणा आहे. फ्लोरिडा, कॅरिबियन, ब्राझील, पश्चिम आशिया आणि इंडोनेशियाच्या पश्चिम किनाऱ्यापासून पूर्व आफ्रिकेतील खडकांपर्यंत तसेच ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रीफ आणि टांझानिया, मॉरिशस, पॅसिफिक,हिंद महासागरातील प्रवाळांवर परिणाम झाला आहे,असेही ते म्हणाले.

१९९८ साली पहिली विरंजन घटना नोंद

पॅसिफिक, अटलांटिक व हिंदी महासागराच्या म्हणजेच सर्व महासागरातील किमान १२ टक्के प्रवाळांना वर्षात विरंजन होण्याइतपत उष्णता सहन करावी लागल्यास जागतिक विरंजन होते,असे घोषित केले जाते. १९९८ मध्ये पहिली घटना घडली, ज्यात महासागरातील २० टक्के रीफ प्रवाळ विरंजनाइतपत उष्णतेच्या प्रभावाखाली आले. तर दुसरी घटना, २०१० मध्ये घडली. यात, ३५ टक्के प्रवाळांवर परिणाम झाला होता. तर तिसरी घटना २०१४ ते २०१७ दरम्यान नोंदली. यात ५६ टक्के प्रवाळ प्रभावित झाले,असे डॉ. इंगोले म्हणाले.

प्रवाळ असतात समुद्राचे वास्तुविशारद !

प्रवाळ खडक जैवविविधतेने समृद्ध आहेत, त्यामुळे सागरी जीवन टिकवून ठेवण्यास महत्त्वाचे आहेत. प्रवाळांतून दरवर्षी लाख कोटी डॉलर्सची कमाई होते. प्रवाळबेटांमुळे शैवाले, शैवालभक्षी मृदुकाय, तसेच माशांना अधिवास मिळतो. प्रवाळभित्तीमुळे स्पंज, कृमी, शैवाले, मासे यांची एक परिसंस्था होते. जी मत्स्योद्योगात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची ठरते. प्रवाळांना समुद्राचे वास्तुविशारद असे म्हटले जाते, असे डॉ.इंगोले यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco ATM Scam: एटीएममध्ये पैसे भरणारेच निघाले चोर! खासगी कंपनीच्या 5 कर्मचाऱ्यांनी लंपास केले 14 लाख; वास्कोतील धक्कादायक प्रकाराने खळबळ

Goa Tiger Symbolism: वाघाच्या पुढच्या 2 पायांमध्ये रानडुक्कर, तर मध्ये छोटेखानी सिंह; वागऱ्यागाळ येथील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती

Vaibhav Suryavanshi Century: 15 षटकार 11 चौकार...! 32 चेंडूत शतक ठोकत रचला इतिहास, कतारमध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं वादळ VIDEO

Viral Video: भर रस्त्यात काकाची 'दारु पार्टी'! कुणाचीही हटवण्याची हिंमत नाही, व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले, "काका ऑन रॉक"

VIDEO: बुमराहच्या तोंडून निघाली शिवी, बावुमाच्या उंचीवर केलेलं वक्तव्य व्हायरल; म्हणाला, 'बौना भी तो है यह...'

SCROLL FOR NEXT