Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : त्याला मिळाली जगण्याची उमेद! वडाच्या खोडाला पालवी

Panaji News : पुनरुज्जीवन यशस्वी होण्याची आशा

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, एप्रिल महिन्याच्या ५ तारखेपूर्वी सांतिनेजमधील वडाच्या झाडाला आपल्यावर घाला घातला जाणार असल्याची पुसटसीही कल्पना नसावी. २०० वर्षांपासून त्याच्या शाखा त्याच्या अंगा-खांद्यावर खेळत होत्या.

त्यामुळे त्याला दीर्घायुष्य लाभत असल्याचा भासही झाला असेल. बाजूच्या गलिच्छ परिसराचे तसे त्याचे सख्य असल्याचा त्याला दररोज भास होत असावा. स्मार्ट सिटीच्या कामामुळे त्याला उन्मळून काढले, तेव्हा त्याला संपल्यासारखे वाटले, परंतु अखेर कांपालच्या नव्या फुटबॉल मैदानावर पुनरुज्जीवन मिळाल्याने त्याच्या जगण्याच्या आशा नक्कीच पल्लवीत झाल्या असणार.

वड... मुका जीव... पण अनेक वर्षे जमिनीवर ठाण मांडून राहण्याची ताकद कोणात असेल तर ती ‘वडा’तच. वटपौर्णिमेचे औचित्य साधून इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटडने (आयपीएससीडीएल) सांतिनेजमधून पुनरुज्जीवन देण्यासाठी आणलेल्या वडाच्या खोडाने त्याच्या सभोवताली गुंडाळलेल्या कापडातून शुक्रवारी सकाळी बाहेर डोकावले.

कांपाल मैदानावर आता त्या खोडाला पालवी फुटली आहे, फुटलेली पालवी आणि फांद्यावरील पाने खोडाच्या आडून भोवतालचा परिसर न्ह्याहळत असतील, असे त्याला पाहिल्यानंतर वाटणे साहजिक आहे. ५ एप्रिल रोजी रात्री त्या खोडाला कांपाल मैदानावर आणण्यात आले, कदाचित तेव्हा त्याला लाकडाच्या वखारीत नेत असावे, असेही वाटले असेल.

पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, लँडस्केप तज्ज्ञ डॅनियल डिसोझा यांच्या उपस्थितीत या खोडाच्या भोवतालचे कापड हटविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT