Cm Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : नशामुक्त भारतासाठी जागृती गरजेची : मुख्यमंत्री सावंत

Cm Pramod Sawant : ‘काळोखी वाट’ मधून समाजाला संदेश

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, अमली पदार्थांच्या आहारी गेल्यानंतर तरुण वेगवेगळ्या कचाट्यात सापडतो. नशामुक्त भारतासाठी तरुणामध्ये जागृती गरजेची आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

‘काळोखी वाट’ हा ड्रग्सच्या दुष्पपरिणामाविषयी संदेश देणारा लघुपट असून तो युवकांपर्यंत पोहोचायला हवा, यावरही भर दिला.

समाजकल्याण खाते आणि केंद्र सरकारचे सामजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय यांच्या सौजन्याने येथील मॅकनिझ पॅलेसमध्ये बुधवारी अमलीपदार्थ विरोधी दिवसाचे औचित्य साधून ‘काळोखी वाट’ लघुपटाचा प्रिमियर शो आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, संचालक अजित पंचवाडकर, सचिव ई. वल्लवन (आयएएस), सी.जी.जॉर्ज, डॉ. नूतन डिचोलकर व लघुपटाच्या निर्मात्या तथा पटकथा लेखिका ज्योती कुंकळकर उपस्थित होत्या.

सुभाष फळदेसाई म्हणाले, की तरुणांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून वाचविण्यासाठी आम्ही आज शपथ घेतली. त्याला स्मरून अमली पदार्थांचे जाळे उखडून टाकण्यासाठी कार्यरत राहूया. आपल्या देशात ६५ टक्के तरुण आहेत. तेव्हा तरुण ड्रग्सच्या आहारी गेल्यास देशाची स्थिती वाईट होईल. ‘काळोखी वाट’ लघुपट पालक व विद्यार्थ्यांनी बघायला हवा कारण त्यातून बोध घेण्यासारखा आहे.

ज्योती कुंकळकर म्हणाल्या, चित्रपट काढणे आर्थिकदृष्ट्या धाडसाचे आहे. त्याला चिकाटी लागते, परंतु ते प्रभावी माध्यम आहे. हा चित्रपट निश्चितच सामाजिक संदेश सर्वांपर्यंत पोहोचवेल. केंद्र व गोवा शासनाच्या समाज कल्याण खात्याने ही संधी दिली हे माझे भाग्य समजते.

दरम्यान, अजित पंचवाडकर यांनी स्वागतपर भाषणात समाज कल्याण खाते अमलीपदार्थ विरोधी राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी लघुपटातील प्रमुख कलाकार रघुनाथ साकोर्डेकर, डॉ. रूपा च्यारी, मौर्य च्यारी, मेगन डिसोझा आदींचा तसेच निर्मात्या ज्योती कुंकळकर, दिग्दर्शक शिरीष राणे, सहयोगी दिग्दर्शक जुईली पारखी तसेच ज्यांच्या बंगल्यात चित्रिकरण झाले व डॉक्टरची छोटी भूमिका वठविलेले डॉ. पॉल फर्नांडीस यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. रूपा च्यारी यांनी सूत्रसंचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Astrology Today: बुधादित्य योगामुळे धनलाभ आणि नव्या संधी; वृषभ, मिथुनराशीसोबत 'या' लोकांसाठी अत्यंत लाभदायक दिवस

Colvale Jail: कोलवाळ कारागृहाला ‘मानवाधिकार’ने फटकारले! शौचालयांमध्ये दरवाजांचा अभाव; जॅमरसह सीसीटीव्‍हींची शिफारस

Goa Politics: खरी कुजबुज; भाऊ, कशी होणार रे विरोधी आघाडी!

Goa live News: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाच्या नवीन अधीक्षक म्हणून सुचेता बी. देसाई यांची नियुक्ती

Goa Crime: हॉटेल रेटिंग करा, पैसे मिळवा! गोव्यातील महिलेला 3 लाखांचा गंडा; संशयिताला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT