Minister Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

Panaji BLO: बाबूश मोन्सेरात यांना झटका! 28 बीएलओंच्या बदलीला अखेर स्थगिती; पूर्वीप्रमाणेच राहणार ताबा

Panaji Election Booth Officers: पणजी मतदारसंघातील बुथस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) अचानक केलेल्या बदलीला विरोध वाढू लागल्याने अखेर तो बदलीचा आदेश जिल्हा निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी स्थगित ठेवला आहे.

Sameer Panditrao

पणजी: पणजी मतदारसंघातील ३० पैकी २८ बुथस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) अचानक केलेल्या बदलीला विरोध वाढू लागल्याने अखेर तो बदलीचा आदेश जिल्हा निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी स्थगित ठेवला आहे.

पूर्वीप्रमाणेच बदली झालेल्या बीएलओंकडे ताबा राहणार असून तेच मतदार याद्यांची उजळणीचे काम करतील. तसेच नव्या बीएलओंना आता पूर्वीच्याच कामाच्या ठिकाणी जावे लागणार आहे. ही स्थगिती मिळाल्याने मंत्री बाबूश मोन्सेरात यांना हा झटका असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे बदलीविषयी तक्रारी वाढल्या होत्या. उत्पल पर्रीकर यांनीही याला आक्षेप घेतला होता. शिवाय ‘सिटिझन्स फॉर डेमोक्रेटिक्स’चे नेते एल्विस गोम्स, नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी लेखी निवेदनाद्वारे आक्षेप नोंदविला होता.

याची दखल घेत मुख्य निवडणूक कार्यालयातील उपमुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हा निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडे बदली आदेशाविषयी गुरुवारी (ता. १२ जून) दुपारपर्यंत कृती अहवाल सादर करण्यास सांगितले होते.

त्यानुसार नव्या बीएलओंच्या नियुक्ती आदेशाला स्थगिती देण्याचा आदेश तिसवाडी उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक नोंदणी अधिकारी राजेश आजगावकर यांनी जारी केला.

मे महिन्यात पणजीतील २८ बीएलओंच्या अचानक केलेल्या बदलीविषयी गोम्स यांनी लेखी तक्रार केली होती. अचानक केलेल्या बदलीमागे कारण काय, अशी विचारणाही त्यांनी केली होती. शिवाय त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील कामकाजाविषयीही प्रश्न उपस्थित केले होते.

फुर्तादोंचाही आक्षेप

बीएलओंच्या या बदलीविषयी यापूर्वी उत्पल पर्रीकर यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्याचबरोबर आज सकाळी नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे या बदल्यांना स्थगिती मागितली होती. हा बदली आदेश बेकायदेशीर असल्याने त्याला फुर्तादो यांनी आक्षेप घेतला होता.

सरकारचा निर्णय योग्य; उत्पल पर्रीकर

बीएलओंच्या बदलीविषयी मी प्रश्न उपस्थित केले होते. आगामी निवडणूक प्रक्रिया आपल्याला हवी तशी पार पाडता यावी, यासाठी नव्या बीएलओंना आणण्याचा डाव होता. मंत्री आपल्या खात्याचा वापर गैरकामासाठी करीत आहेत. आता निवडणूक प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडेल आणि निवडणूक खात्यावरील विश्वास वाढेल, असे उत्पल पर्रीकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: सैन्यात भरती होण्यासाठी धावायचा, आज बनला देशाचा हिरो! गुलवीर सिंहने रचला इतिहास; 10,000 मीटर शर्यतीत जिंकलं 'सिल्व्हर' पदक

Anjuna Drowning Incident: पाय घसरला अन् थेट उधाणलेल्या समुद्रात कोसळला! 26 वर्षीय मणिपूरच्या तरुणाचा मृत्यू;  हणजूण समुद्रकिनाऱ्यावरील धक्कादायक घटना

Sanjeel Kudchadkar Kidnapping Case: "चलत्या गाडीत गळा दाबून मारण्याचा प्रयत्न!" संजील कुडचडकरची धक्कादायक जबानी; पत्नी लुईझा अद्याप बेपत्ताच

Jantar Mantar Student Protest: आंदोलक दहशतवादी होते का? लोकसभेत प्रियांका गांधींचा रुद्रअवतार; विद्यार्थ्यांच्या दडपशाहीवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल

Goa Drowning Incident: उधाणलेल्या लाटा अन् जीवरक्षकांचे शौर्य! सलग तीन दिवसांत 3 होड्या उलटल्या; कोलवा आणि बाणावलीत 28 मच्छीमारांची सुखरुप सुटका

SCROLL FOR NEXT