goa Dainik Gomantak
गोवा

Smart City : विलंबाचे खापर सल्लागारावर; स्मार्ट सिटीचे काम ९० टक्के पूर्ण

Smart City : सध्या स्मार्ट सिटीची ९० टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे काही दिवसांत पूर्ण होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रसार माध्यमांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Smart City :

पणजी, स्मार्ट सिटीच्या कामांना विलंब झाला, त्याला यापूर्वीचे सल्लागार जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच स्मार्ट सिटीच्या कामांचे गणित बिघडले. प्रारंभी चुकीचा सल्लागार निवडला होता.

सध्या स्मार्ट सिटीची ९० टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे काही दिवसांत पूर्ण होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रसार माध्यमांनी दिली.

शनिवारी मुख्यमंत्री सावंत यांनी पणजीत स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी केली. महालक्ष्मी मंदिराकडून सकाळी ११.२० वाजता पाहणीला सुरवात झाली.

याप्रसंगी त्यांच्यासमवेत महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे (आयपीएससीडीएल) सीईओ संजीत रॉड्रिग्स, महापौर रोहित मोन्सेरात, उपमहापौर संजीव नाईक, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता उत्तम पार्सेकर, आयुक्त ग्लेन मेदेरा, अभियंता विवेक पार्सेकर आदी उपस्थित होते.

पणजीवासीयांनी लवकरात लवकर नवीन मलनिस्सारण व्यवस्थेची जोडणी घ्यावी, असा सल्ला मुख्यमंत्री सावंत यांनी दिला. सांडपाणी पाईपलाईन आणि मॅनहोल्सचे काम पूर्ण झाले आहे. घरे नवीन सीवरेज सिस्टीमला जोडली गेल्यावर जुनी सीवरेज सिस्टीम काढली जाईल, असे सावंत

म्हणाले.

...तर वीज, पाणी जोडणी तोडणार

नागरिक आणि आस्थापने मिळून ५८ जण सांतिनेज खाडीत सांडपाणी सोडतात, असे आढळले आहे. त्यांनी त्वरित हे सांडपाणी सोडणे बंद करावे. नवीन मलनिस्सारण व्यवस्थेची जोडणी न घेतल्यास संबंधितांचे वीज व पाणी कनेक्शन तोडण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. स्मार्ट सिटीच्या कामांमुळे पणजीतील लोकांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण काही लोकांना नाहक टीका करण्याची सवयच झाली आहे. त्यांनी रस्त्यावर येऊन नेमके काय काम झाले ते पाहावे, असेही त्यांनी सुनावले.

पणजीत पूर टाळण्यासाठी प्रयत्न

पावसाळ्यात राजधानी शहर पाण्याखाली जाऊ नये, यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे. पावसाळ्यात भरतीवेळी शहरात येणारे पाणी स्टॉर्म वॉटर ड्रेनेजच्या समस्येमुळे आतच राहते. त्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण होते. मांडवी नदीतील (जेथे शहरातील पाणी मांडवीत मिळते) काही भागांतील गाळ काढण्यात येईल. याशिवाय मळ्यामध्ये स्लुईस गेट टाकण्याची आणि पाणी उपसा करण्याची योजना जलस्रोत खात्याने आखली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी

नमूद केले.

बस थांब्यांच्या रचनेत बदल

कनेक्टिव्हिटी, ड्रेनेज, डिसिल्टिंगची कामे येत्या दोन-तीन दिवसांत हाती घेतली जातील. १८ जून आणि आत्माराम बोरकर रस्त्यांचे काम नंतर हाती घेण्यात येईल. त्यासाठी वेळेचे बंधन असणार नाही. स्मार्ट सिटीच्या कामांचा दर्जा ९० टक्के आहे; परंतु काही ठिकाणी समस्या उदभवू शकतात. मात्र, या समस्यांचे निराकरण करण्यासाठी समान कंत्राटदार तयार केले जातील. स्मार्ट सिटी बस थांब्यांच्या संरचनेत बदल केला जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.

पुढील २५ वर्षांची सोय

स्मार्ट सिटीची सुमारे ९० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. ते म्हणाले, पोर्तुगीज काळातील मलनिस्सारण योजना निकामी झाली आहे. नव्याने मलनिस्सारण वाहिनी टाकताना अनेक मोठी आव्हाने समोर ठाकली. मात्र, पुढील २५ वर्षांची नागरिकांची सोयी लक्षात घेऊन शहरात कामे केली आहेत, असे सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT