Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : पाककृतीतून निर्मितीशीलतेचे दर्शन; ‘गोमन्तक तनिष्का’तर्फे आयोजन

Panaji News : सीएमएम अरेना आयोजित सोफा महोत्सवात ही अनोखी अशी ''गोड पदार्थ'' बनवण्याची स्पर्धा ठेवण्यात आली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, सीएमएम अरेना आणि गोमन्तक तनिष्का व्यासपीठ आयोजित गोड पदार्थ बनवण्याची स्पर्धा नुकतीच पार पडली. ‘गोड पदार्थ’ अशी संकल्पना घेऊन महिलांसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेत गोव्यातील विविध भागातील ४४ महिलांनी भाग घेतला होता.

महिलांमधल्या निर्मितीशीलतेचे दर्शन या पदार्थांच्या माध्यमातून घडले.

सीएमएम अरेना आयोजित सोफा महोत्सवात ही अनोखी अशी ''गोड पदार्थ'' बनवण्याची स्पर्धा ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत शोभन देसाई यांना प्रथम क्रमांक, झीनत शेख यांना द्वितीय क्रमांक आणि दीपल ध्रुव यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. प्रथम क्रमांक मिळालेल्या शोभन देसाई यांनी ''मस्कमेलन हलवा'' बनवला होता. द्वितीय क्रमांक मिळवलेल्या झीनत शेख यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने अननसाचा शीरा बनवला होता तर दीपल ध्रुव यांनी आमरसातली अंगूर मलई बनवली होती.

याशिवाय बीटपासून, तृणधान्यापासून, खजूर, फणस, आंबा, नाचणी असे वेगवेगळे पौष्टिक घटक वापरून महिलांनी गोड पदार्थ बनवले होते.

अननसाचा शीरा सोबत अननसापासून केलेला पोपट लक्षवेधक ठरला. एका स्पर्धक महिलेने तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थासोबत त्याची उपयुक्तता सांगणारा आकर्षक देखावा केला होता.

तनिष्का गटातल्या पालयेच्या संध्या नाईक यांनी नाचणीचे सत्व करून आणले होते, पण त्याची सजावट फारच माहितीपूर्ण होती. संजना नेमान हिने उकडीचे मोदक आणि त्यासोबत बनवलेल्या मोदकाच्या गणपतीने देखील वाहवा मिळवली. ही फक्त चविष्ट नव्हे तर देखणी स्पर्धा होती.

नऊ वर्षांपासून आयोजन

स्पर्धेचे परीक्षण शेफ कुणाल आरोलकर आणि विविध मोठे मोठ्या स्तरावरील कार्यक्रमांचे संयोजन करणाऱ्या सिध्दी गोवंडे यांनी केले. नैसर्गिक, सेंद्रिय साधने वापरून साधे वाटणाऱ्या पदार्थांची अतिशय कल्पकपणे निर्मिती करणाऱ्या महिलांचे परीक्षकांनी कौतुक केले.

महिलांना अधिक क्रियाशील बनवणाऱ्या या स्पर्धेचे खरे सूत्रधार सीएमएम अरेनाचे प्रमुख हरी कौल आहेत. गेली नऊ वर्षे हरी कौल मोठ्या उत्साहाने ही स्पर्धा आयोजित करत असतात. परीक्षकांसोबत हरी कौल यांनी सर्व सहभागी स्पर्धकांच्या पदार्थांची चव घेऊन बघितली.

सहभागींना भेट

सीएमएम अरेना हे फक्त गृहोपयोगी वस्तू - फर्निचर विकणारे आस्थापन नाही, तर कुटुंबांना जोडणारे केंद्र आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्रक, भेटवस्तू देण्यात आली. अतिशय उत्तम अशा संयोजनाने सर्व स्पर्धक भारावून गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'घाली धिंगाणा, मुंबईचा शाणा...' कोकणातील क्रिकेटवेड्या चाहत्यांनी 'हिटमॅन'साठी गायलं खास गाणं, पाहा व्हायरल व्हिडिओ

Dabolim Airport: दाबोळीला 'देशांतर्गत विमानतळ' दर्जा देण्‍याचा प्रस्‍ताव नाही

ISL 2026: एफसी गोवाची अपराजित मालिका खंडित, बंगळूर एफसीचा 2-0 असा सफाईदार विजय

Black Coffee Music Event controversy: 'ब्लॅक कॉफी' कार्यक्रमावरून वाद, काँग्रेसकडून चौकशीची मागणी; प्रशासनावर मोठे आरोप

उन्हाचा चटका आणि महागाईचा फटका! घामाच्या धारांनी नागरिक हैराण; मागणी वाढल्याने भाजीपाला-फळं महागली

SCROLL FOR NEXT