Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : गावडेंच्या समर्थनार्थ मूठभर एकत्र; पत्रकारांवरही टीका

Panaji News : मंत्री समर्थक कलाकारांकडून पाठराखण

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, दोन दिवसांपूर्वी कला अकादमीच्या मुद्द्यावर गोव्यातील कलाकारांनी घेतलेल्या बैठकीमुळे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांना धक्का बसल्याचे दिसत आहे.

शनिवारी सकाळी पणजी येथे मिनेझिस ब्रागांझा हॉलमध्ये मंत्री गोविंद गावडे समर्थक कलाकारांनी मंत्री गावडे यांची वकिली करण्यात आपली कला दाखवली आणि कला अकादमीच्या कामाबद्दल प्रश्न करणाऱ्या कलाकार आणि पत्रकारांवर गरळ ओकली. 

काही मंत्री गावडे समर्थक कलाकारांनी मंत्री  गावडे यांना ज्या पद्धतीने पाठिंबा दिला आणि त्यांची वकिली केली, त्यावरून त्यांचा बोलण्याचा धनी कोण? हे स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपूर्वी ‘गुज’चे सभागृह भरलेले असताना आणि लोक बाहेर उभे असतानाही सभेला मोजकेच लोक होते, असे हे मंत्री समर्थक कलाकार म्हणाले.

ही बैठक राजकीय हेतूने प्रेरित असून केवळ गावडे यांच्यावरच टीका आणि आरोप करण्यात आल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.कला अकादमीतील भ्रष्टाचार आणि त्रुटी दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न केल्याबद्दल गोविंद गावडे समर्थक कलाकारांनी गोमन्तक टीव्हीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. कलाकारांना मारामारी आणि आंदोलने आवडत नाहीत, त्यांनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना भेटून कला अकादमीतील त्रुटी निदर्शनास आणून द्याव्यात, असा मजेशीर तर्कही त्यांनी यावेळी लावला. 

पत्रकार परिषदेला नाट्य कलाकार चिदानंद मडकईकर, महेंद्र गावकर यांच्यासह गावातील काही कलाकार उपस्थित होते. पत्रकार परिषदेत मंत्री समर्थक कलाकारांनी, काही कलाकार कला अकादमीच्या कामावर अशी खरमरीत टीका करून हे कलाकार कला अकादमीच्या कामात अडथळा आणत आहेत, त्यामुळे कला अकादमीचे काम पूर्ण होण्यास आणखी विलंब होऊ शकतो, असा अजब युक्तिवाद त्यांनी केला. 

सखोल अभ्यास करा

कला अकादमीसारखी नसेल तर नाटककार राजदीप नाईक कला अकादमीत इतकी नाटकं कशी करतात, असा सवालही त्यांनी यावेळी प्रस्तुत केला. या प्रश्नाला उत्तर देताना राजदीप नाईक यांनी पत्रकार परिषद घेणाऱ्या कलाकारांना त्यांच्या नाटकांच्या वेळी कला अकादमीत येऊन कोणत्या परिस्थितीत ही नाटके सादर करतात, ते पाहण्याचे आव्हान केले आहे.

तसेच पत्रकार परिषद घेण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घेऊन आणि विषयाचा सखोल अभ्यास करूनच नंतर त्या विषयावर बोलण्याचा सल्लाही त्यांनी या मंत्री समर्थक कलाकारांना दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

SCROLL FOR NEXT