Madkai Fire News: ..आणि बघता बघता होत्याचे नव्हते झाले! मडकईत आगीचे थैमान; दागदागिने, कपडेलत्त्यांसह 10 लाखांचे नुकसान

Goa Fire News: लाडेवाडा-मडकई येथील नाईक कुटुंबीयांच्या राहत्या घराला गुरुवारी सकाळी अचानक आग लागल्याने चार खोल्या जळाल्या. या दुर्घटनेत सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले.
Madkai Fire News| Goa Fire News
Madkai Fire News| Goa Fire NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मडकई: लाडेवाडा-मडकई येथील नाईक कुटुंबीयांच्या राहत्या घराला गुरुवारी सकाळी अचानक आग लागल्याने चार खोल्या जळाल्या. विशाल नाईक, मंगेश नाईक व इतरांच्या खोल्‍यांचा त्‍यात समावेश आहे. या दुर्घटनेत सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले.

आग लागली तेव्हा घरात कुणीच नव्हते. त्यामुळे ही घटना उशिरा लक्षात आली. माहिती मिळताच कुंडई व फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र त्‍यापूर्वीच खोल्‍यांमधील दागदागिने, कपडेलत्ते जळून खाक झाले होते.

ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागल्यानंतर घरात कुणीच नसल्याने भडाका उडाला. त्यामुळे जास्त नुकसान झाले. अधिक चौकशी सुरू आहे.

Madkai Fire News| Goa Fire News
पर्यटकांच्या फटाक्यांमुळे मच्छिमाराचे 'रापण' खाक; मोठ्या आर्थिक नुकसानानंतर भरपाईची मागणी!

मांद्रे, दिवाडी, चोडण परिसरात वीज खंडित

वीज खात्‍याला २०० केव्हीए दांडोसवाडा ट्रान्सफॉर्मवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने उद्या २ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत दांडोसवाडा आणि मांद्रे पंचायतीच्या सभोवतालच्या भागात वीजपुरवठा केला जाणार नाही.

Madkai Fire News| Goa Fire News
Arpora Nightclub Fire: हडफडेतील क्लब संरचना मूलतःच बेकायदेशीर, व्यापार परवाना नाही हे माहित होते; पंचायत सचिवाची जबानी

तसेच ११ केव्ही दिवाडी फिडरवरून सकाळी १० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत सौदे ग्राऊंड, पांडववाडा आणि चोडण गावाच्या सभोवतालच्या भागात वीज खंडित असेल. शिवाय ११ केव्ही शिवोली फिडर व २०० केव्ही पार्सेकर कॉलेज वितरण ट्रान्‍सफॉर्मरवरून ३ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत अक्रॉन टीना व्हिला, फर्नांडिसवाडा, मार्ना, मधलावाडा आणि पार्सेकर कॉलेज परिसरात वीज खंडित असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com