Benaulim ZP By-Poll Dainik Gomantak
गोवा

Benaulim ZP By-Poll: बाणावली जिल्हा पंचायत निवडणूक; दहा प्रभागांसाठी 14 अर्ज; इंडी आघाडीत उमेदवारीवरून धुसपूस

Benaulim ZP By-Poll: शेल्डे पंचायतीमधून एकही अर्ज दाखल झालेला नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Benaulim ZP By-Poll

येत्या २३ जूनला होणाऱ्या दहा पंचायत प्रभाग पोटनिवडणुकीसाठी आज पाचव्या दिवशी ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत अर्ज दाखल झालेल्यांची संख्या १४ वर पोहचली आहे.

बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी अजूनही एकही अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. या मतदारसंघात ‘आप’च्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या इंडी आघाडीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे व धुसफूस सुरू झाली आहे.

सुकूर पंचायतीच्या प्रभाग १० मधून सुभाष रामनाथ हळर्णकर व हेरंब हरेश हळर्णकर या दोघांनी, वळवई प्रभाग २ मधून अंकिता अंकुश नाईक, कुंडई प्रभाग ७ मधून सजना सुदेश नाईक, बोरी प्रभाग ११ मधून दत्तेश रमेश नाईक, राशोल प्रभाग ५ मधून मिफा तेरिन डायस व सेरावली प्रभाग २ मधून जुलियेटा गोम्स यानी आज उमेदवारी अर्ज संबंधित तालुक्याच्या मामलेदार कार्यालयात दाखल केले.

आतापर्यंत सुकूर व वळवई पंचायतमधून प्रत्येकी ३, सेरावलीमधून २ तर कुडणे, कुंडई, केरी, बोरी, असोल्णा, राशोल पंचायतीमधून प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला आहे. शेल्डे पंचायतीमधून एकही अर्ज दाखल झालेला नाही.

बाणावली जिल्हा पंचायत मतदारसंघातून भाजप किंवा इंडी आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला नाही. इंडी आघाडीमध्ये उमेदवारीवरून धुसपूस सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT