Goa News Dainik Gomantak
गोवा

Pakistani Flag: पाकिस्तानी झेंड्यावरुन गोव्यात रंगले राजकारण; भाजपची पोलिसांत तक्रार, काँग्रेसचाही आक्षेप

Pakistani Flag Painted On Road In Goa: विधानसभेचे सभापती रमेश तवडकरांनी याप्रकरणी काणकोण पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.

Pramod Yadav

काणकोण: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. गोव्यात काणकोण येथे रस्त्यावर दोन ठिकाणी रंग वापरुन पाकिस्तानी ध्वज साकारण्यात आला आहे. यावरुन भाजपकडून या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय. तर काँग्रेस नेते सुनील कवठणकरांनी देखील यावरुन आक्षेप नोंदवत संबधित व्यक्ती विरोधात कारवाईची मागणी केलीय.

विधानसभेचे सभापती रमेश तवडकरांनी याप्रकरणी काणकोण पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. अनोळखी व्यक्तीविरोधात कारवाई करण्याची मागणी तवडकरांनी तक्रारीतून केलीय. पाकिस्तानी ध्वज काणकोण पालिकेच्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी साकारण्यात आला आहे. याप्रकरणी संबधित दोषी व्यक्तीवर भारतीय न्याय संहितानुसार कारवाई करण्याची मागणी तवडकरांनी केली आहे.

यापूर्वी गोवा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकरांनी याप्रकरणी कारवाईची मागणी केली. देशात अशा पद्धतीने पाकिस्तानी ध्वज साकारला जाऊ नये, त्याऐवजी तो जाळून टाकावा, असे कवठणकर म्हणाले. कोणाला निदर्शन करायचे असल्यास ते खुल्या पद्धतीने करावे, असेही कवठणकर म्हणाले.

गिरिराज पै वेर्णेकरांची कवठणकरांवर टीका

पाकिस्तानी ध्वज रस्त्यावर साकारला म्हणून सुनील कवठणकर का रडतायेत? त्यांची तिथेच जागा आहे. पाकिस्तानचा अपमान केला म्हणून भारतीय नागरिकाला अटक करावी, अशी त्यांची मागणी आहे? पाकिस्तानसोबत उभं राहून अशाच पद्धतीने काँग्रेस नेते कोसळले आहेत, अशा शब्दात वेर्णेकर यांनी कवठणकरांवर टीका केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2025: 13 कोटींचा खेळाडू 'यलो आर्मी'तून बाहेर! जडेजापाठोपाठ CSKचा आणखी एका स्टारला रामराम?

सांताक्रूझ अपघातानंतर वीज विभागाची कारवाई; EE काशीनाथ शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली मोहीम!

भारतात DPDP कायदा लागू, Social Mediaवरील नियम अधिक कठोर होणार, काय बदल होतील? जाणून घ्या

Pooja Naik: पुलिस आमचें Useless, 'त्या' तपास अधिकाऱ्यावरच 5 लाचखोरीचे गुन्हे; तपास कसा होणार? विजय सरदेसाई संतापले

Goa Vs Rajasthan Tourism: पधारो म्हारो देस! संस्कृती दाखवणारे राजस्थानचे पर्यटन; गोव्याने ही कला शिकण्यासारखी..

SCROLL FOR NEXT