Goa Fraud Case: दोन हजार लोकांची 10 कोटींची फसवणूक; UP नंतर गोव्यातही कल्पतरू कंपनीचा नागरिकांना गंडा

Goa Crime News: दोन हजार लोकांनी कल्पतरू कंपनीच्या एमडीसह अर्धा डझनहून अधिक संचालकांविरुद्ध १५०० तक्रारी दाखल केल्या होत्या. पणजी पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.
Goa Fraud Case
Goa Fraud CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: उत्तर प्रदेशातील कल्पतरू ग्रुप ऑफ कंपनीजचे एमडी, संचालक इत्यादींवर केवळ मथुरा आणि उत्तर प्रदेशमध्येच नव्हे तर इतर अनेक राज्यांमध्येही विविध प्रकरणांमध्ये लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आता गोव्यातून एक नवीन प्रकरण समोर आले आहे.

गोव्यात, पाच वर्षांत रक्कम दुप्पट करण्याच्या नावाखाली १० कोटींहून अधिक रुपये घेतल्याच्या आरोपाखाली सुमारे दोन हजार लोकांनी कल्पतरू कंपनीच्या एमडीसह अर्धा डझनहून अधिक संचालकांविरुद्ध १५०० तक्रारी दाखल केल्या आहेत. पणजी पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.

चिट फंड, एफडी आणि फ्लॅट्स, व्हिलाच्या नावाखाली शेकडो लोकांशी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये मथुरा गुन्हे शाखेच्या पथकाने नऊ वर्षांनी तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केले आहे.

Goa Fraud Case
Tragic Incident Goa: फोनवर बोलताना नाही राहीले भान, टेरेसवरुन पाय घसरुन गोव्यात तरुणाचा मृत्यू

गोव्यात पैसे दुप्पट करण्याच्या प्रकरणात ग्रुप एमडी जय किशन सिंह राणा यांच्यासह ११ जणांविरुद्ध सुमारे २००० लोकांनी १५०० तक्रारी दाखल केल्या आहेत.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये पणजीमध्ये कल्पतरू बिल्डटँक कॉर्पोरेशन लिमिटेड आणि कनक रिअल टेक इंडियाच्या नावाखाली पाच वर्षांत रक्कम दुप्पट करण्याच्या नावाखाली सुमारे दोन हजार लोकांकडून १० कोटींहून अधिक रुपये घेऊन परत न करता फसवणूक केली, असा आरोप करण्यात येत आहे.

Goa Fraud Case
Goa Murder Case: बायको सतत प्यायची दारु! मुंगुल फातोर्डा येथे पतीने पत्नीचा खून का केला?

याप्रकरणी पूर्वी प्रयागराज, आग्रा, मथुरा, कानपूर, गाझियाबाद, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणी कल्पतरू कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध अनेक एफआयआर दाखल झाला आहे.

गोव्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. बी-वॉरंटच्या आधारे आरोपींना चौकशीसाठी गोव्यात आणले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, कल्पतरू ग्रुपचे एमडी जेकेएस राणा यांचा कोरोना काळात मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. पोलिसांकडेही त्यांचे मृत्युपत्र आहे. असे असले तरी, अजूनही जेकेएस राणा यांना पोलिसांच्या नोंदींमध्ये मृत मानले गेलेले नाही. पोलिस अजूनही जेकेएस राणाचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com