FIR Dainik Gomantak
गोवा

'पाकिस्तान झिंदाबाद' फलकप्रकरणी हणजूण पोलिसांची मोठी कारवाई, 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; व्हिस्की पीडिया स्टोअरचे मालक अडचणीत!

Goa Police Action: हडफडे येथील एका वाईन स्टोअरवर 'पाकिस्तान झिंदाबाद' (Pakistan Zindabad) लिहिल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली.

Manish Jadhav

Goa Police Action: हडफडे येथील एका वाईन स्टोअरवर 'पाकिस्तान झिंदाबाद' लिहिल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली. या दुकानातील LED बोर्डवर ही घोषणा झळकवल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप होता. हे लक्षात घेऊन हणजूण पोलिसांनी ही कारवाई केली.

हडफडे येथील रोशन रेडकर यांनी याविरोधात हणजूण पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, 4 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 9:50 वाजता 'व्हिस्की पीडिया' (Whiskey Pedia) नावाच्या वाईन स्टोअरवर हे जाणीवपूर्वक लिहिण्यात आले. यानंतर याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या आरोपींमध्ये (Accused) रणछित भाटिया, विपिन पाहुजा (हरियाणा), विनय चंद्र राव आणि कृष्णा लामानी (कर्नाटक) तसेच मनोज कुमार (बिहार) यांचा समावेश आहे. हे सर्वजण परराज्यातील आहेत.

गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल

दरम्यान, या कृत्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला. आरोपींवर सार्वजनिक शांतता भंग केल्याबद्दल बीएनएस (BNS) 2023 चे कलम 152 आणि 61(2) तसेच सायबर गुन्ह्यांशी संबंधित माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याचे कलम 66सी आणि 66एफ यांसारखी गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. या संवेदनशील प्रकरणाचा तपास हणजूण (Anjuna) पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) नवनीत गोलतेकर करत आहेत. आरोपींचा नेमका हेतू काय होता आणि यामागे कोणते षडयंत्र आहे, याचा सखोल तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT