SCO Meeting 2023 Dainik Gomantak
गोवा

SCO Meeting: मोठी बातमी! गोव्यात होणाऱ्या SCO बैठकीला उपस्थित राहण्यास पाकिस्तानचा नकार

या बैठकीत चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया आणि उझबेकिस्तान भाग घेणार आहेत.

Pramod Yadav

SCO Meeting 2023: पाकिस्तानने गोव्यात होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालायाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. या बैठकीत चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया आणि उझबेकिस्तान भाग घेणार आहेत. मात्र, या बैठकीत पाकिस्तानने सहभागी होण्यास नकार दिला आहे.

(Pakistan will not participate in SCO meeting to be held in Goa)

या वर्षी मे महिन्यात गोव्यात होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) बैठकीत सहभागी होण्याबाबत पाकिस्तानने कोणताही निर्णय घेतला नव्हता. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत काहीही सांगणे घाईचे असल्याचे म्हटले होते. 4-5 मे रोजी होणाऱ्या या बैठकीत सहभागी होण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला आमंत्रित केले होते.

दरम्यान, आता पाकिस्तानने गोव्यात होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध जगजाहीर आहेत. कोणतीही चर्चा सुरू करण्यापूर्वी पाकिस्तान जम्मू-काश्मीरमध्ये कलम-370 पुनर्स्थापित करण्याची मागणी करत आहे. तर, भारत काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत पाकिस्तानची मागणी फेटाळत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पाकिस्तान नेहमी काश्मीरचा सूर आळवत असतो. पण, भारत त्यांना नेहमीच चोख प्रत्युत्तर देतो.

सध्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये (SCO) आठ सदस्य राष्ट्रे आहेत. यात चीन, भारत, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे. तर, अफगाणिस्तान, बेलारूस, इराण आणि मंगोलिया सदस्यत्व स्वीकारण्यास इच्छुक असलेली चार निरीक्षक देश आहेत. तर, आर्मेनिया, अझरबैजान, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका आणि तुर्की संवाद भागीदार देश आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT