CM Pramod Sawant  X
गोवा

Operation Sindoor: 'मोदींमुळे देश सुरक्षेला नवे बळ'! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मुख्यमंत्र्यांनी केले पंतप्रधान आणि केंद्र सरकारचे अभिनंदन

CM Pramod Sawant: दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडल्याबद्दल मुख्यमंत्री सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Sameer Panditrao

पणजी : पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या विरोधात निर्णायक कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

डॉ. सावंत यांनी निवेदनात म्हटले, की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृढ आणि परिपक्व नेतृत्वामुळे देशाच्या सुरक्षेला नवे बळ मिळाले आहे. शत्रूंना त्यांच्या भाषेत उत्तर देण्याची ही वेळ होती आणि आपल्या सैन्याने, केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली, अत्यंत प्रभावी आणि यशस्वी कारवाई केली आहे.

देशाच्या सीमांची रक्षा करण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेली ही निर्णायक भूमिका प्रत्येक भारतीयाच्या मनात गर्व निर्माण करणारी आहे. अशा कठीण प्रसंगी संपूर्ण देश एकजूट होऊन सरकारच्या पाठीशी उभा आहे. दहशतवादी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना भारत कधीही माफ करणार नाही, हे या कारवाईतून सिद्ध झाले.’

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, या कारवाईमुळे भारताची जागतिक पातळीवरील प्रतिमा आणखी मजबूत झाली असल्याचे नमूद केले. अशाच भावना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज व्यक्त झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

SCROLL FOR NEXT