Mock Drill: सायरन, पळापळ आणि बचावकार्य! मुरगाव बंदर, दाबोळी, वास्को आणि पणजीत मॉक ड्रिल

Mock Drill in Goa: अनेक ठिकाणी मॉक ड्रिलचा भाग म्हणून सायरन वाजविल्याने लोकांची काही काळ तारांबळ उडाली. संरक्षण यंत्रणांनी काही ठिकाणी आगीच्या दुर्घटनेतून पीडितांचा बचाव केला.
Mock Drill in Goa
Goa Mock Drill Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने मंगळवारी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे यदाकदाचित जर युद्धजन्यस्थिती निर्माण झाली तर जनतेला सतर्क बनविण्याच्या तयारीचा भाग म्हणून आज (ता. ७) बुधवारी ‘ऑपरेशन अभ्यास’ अंतर्गत मुरगाव बंदर, दाबोळी विमानतळ तसेच राजधानी पणजीत मॉक ड्रील करण्यात आले.

अनेक ठिकाणी मॉक ड्रिलचा भाग म्हणून सायरन वाजविल्याने लोकांची काही काळ तारांबळ उडाली. संरक्षण यंत्रणांनी काही ठिकाणी आगीच्या दुर्घटनेतून पीडितांचा बचाव केला, तर काही ठिकाणी बुडितांना सुरक्षित पाण्याबाहेर काढण्याचा सराव केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या आवाहनानुसार, जनतेने उत्स्फूर्तपणे सहकार्य केले, असे मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली यांनी सांगितले.

Operation Sindoor update
Operation Sindoor updateDainik Gomantak

दोन विमानोड्डाणे रद्द

विमानतळ संचालक जॉर्ज वर्गीस यांनी सांगितले की, दाबोळी हे भारतातील सर्वांत मोक्याच्या विमानतळांपैकी एक आहे. यापुढे नौदलाच्या लढाऊ विमानांच्या सरावासाठी अधिक वेळ दिला जाईल. सीमेवरील तणावपूर्ण स्थितीमुळे आज दोन उड्डाणे रद्द केली.

Mock Drill in Goa
Mock Drill In India: मॉक ड्रिल होणार! पण कधी? जाणून घ्या तुमच्या राज्यांची वेळ

सायरन वाजल्यावर अनेकांची उडाली तारांबळ

पणजी फेरी धक्का येथे मांडवी पूल कोसळल्याचा प्रसंग तयार केला. अशा प्रसंगावेळी पाण्यात पडलेल्या लोकांना वाचवण्याची प्रात्यक्षिके करण्यात आली. मांडवी नदीत फायबर बोटीच्या साहाय्याने पाण्यात गटांगळ्या खाणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मदत देणे तसेच वेळेत त्यांना किनाऱ्यावर आणून डॉक्टर्स व परिचारिकांद्वारे त्यांची तपासणी करणे, याप्रकारचा सराव करण्यात आला.

Mock Drill in Goa
Mock Drill: ‘मॉक ड्रील’ होणार म्हणजे युद्ध होणारच असे नाही, जागरूक राहणे मात्र गरजेचे

‘ऑपरेशन अभ्यास’अंतर्गत केलेल्या मॉक ड्रिलचाच भाग म्हणून राज्यातील काही ठिकाणी ब्लॅक आऊट करण्यात आला.

दोनापावल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्टस् (एनआयडब्ल्यूएस) : सायंकाळी ७.३० ते ७.४५ वा.

मडगाव कदंब बस स्टॅण्ड : सायंकाळी ७.३० ते ७.४५ वा.

मडगाव रेल्वे स्टेशन : सायंकाळी ७.३० ते ७.३३ वा.

आयओसीएल आणि वास्को शहर : सायंकाळी ७.३० ते ७.४५ वा.

दाबोळी विमानतळ प्रशासकीय संकुल, चिखली व सांकवाळ (औद्योगिक वसाहत वगळून) : सायंकाळी ७.३० ते ७.४५ वा.आके बायश आणि नावेली : सायंकाळी ७.३० व ७.४५ वा.

कोलवाळ मे. गोवा ग्लास फायबर लिमिटेड : सायंकाळी ७.३० ते ७.४५ वा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com