केरी सत्तरी (Satari) येथे रस्त्यावरील गतिरोधक रंगवताना सामाजिक कार्यकर्ते (दशरथ मोरजकर) Dainik Gomantak
गोवा

केरी सत्तरीत गांधीगीरी, धोकादायक ठरत असलेले गतिरोधक रंगवले

Satari येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी धोकादायक बनत चाललेले गतिरोधक (Speed breaker) रंगावण्याचे काम करीत गांधीगिरीचा प्रत्यय आणून दिला आहे.

दैनिक गोमन्तक

पर्ये : महात्मा गांधीच्या (Mahatma Gandhi) निधनाला 73 वर्षे झाली तरी पण गांधी विचार आजही लोकांमध्ये बऱ्याच प्रमाणात भिनलेला दिसतो. जरी गांधी शरीराने नसला तरी विचाराने अजूनही जिवंत दिसत आहे. समाजात कोणताही बदल घडवायचा असेल तर तो पूर्वी बदल स्वतः मध्ये बदलायला हवा किंवा एखाद्या समस्येकडे सरकारचे (Government) लक्ष वेधयाचे ते काम स्वतः आपण पूर्वी करावे, असे गांधी विचार सांगतात. याचीच प्रचिती आज केरी सत्तरी येथे आली. येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी धोकादायक बनत चाललेले गतिरोधक (Speed breaker) रंगावण्याचे काम करीत गांधीगिरीचा प्रत्यय आणून दिला आहे.

केरी सत्तरी Satari येथे रस्त्यावरील गतिरोधक रंगवताना सामाजिक कार्यकर्ते (दशरथ मोरजकर)

केरी सत्तरीतील चोर्ला घाटाचा मुख्य रस्ता हा तसा गजबजलेला आहे. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ येथे असते. मात्र या रस्त्यावरील खड्डयांनी वाहन चालकांना हैराण बनवले आहेच. त्याचबरोबर या रस्त्यावर अनेक गतिरोधक आहे. रस्त्यावर जर गतिरोधक असल्यास, ते दर्शवणारी रस्त्याबाजूला गतिरोधक चिन्हे असायला हवी आणि गतिरोधकावर पांढरे पट्टे असायला हवे. पण येथील गतिरोधकावर असे पांढरे पट्टे नसल्याने हे गतिरोधक धोकादायक बनले होते येथे अपघातही होत होते. गेल्या दोन दिवसात येथे या गतिरोधकांचा अंदाज न आल्याने दोन अपघात झाले असाच एक अपघात आज सकाळी केरीतील एका गतिरोधक वर झाला. सुदैवाने या अपघातात त्यांना मोठी इजा झाली नाही.

हे गतिरोधक भर वस्तीत असल्याने हे अपघात बऱ्याच लोकांनी पाहिले होते आणि त्या गतिरोधकांचा धोका त्यांच्या लक्षात आला. या मार्गावर आणखी अशा घटना घडू नये म्हणून त्यांनी चक्क गतिरोधक रंगवण्याचे काम हाती घेतले.

पेशाने शिक्षक असलेले चंद्रशेखर गावस यांनी ही गतिरोधक रंगवण्याची संकल्पना सामाजिक कार्यकर्ते विष्णू पारोडकर यांच्याकडे व्यक्त केली आणि गतिरोधक रंगवण्याचे ठरविले. त्यानंतर रंग व ब्रश घेऊन गतिरोधक रंगवायला सुरुवात केली. त्यांना वचन केरकर, नामदेव गावस, पांडुरंग गावस, नुरुद्दीन करोल, विठोबा गावडे, संकल्प पारोडकर आदींनी साथ दिली. त्यांच्याकडून केरी-चोर्ला मार्गावरील 5 गतिरोधक रंगवले आहे.

दरम्यान त्यांच्या या कार्याने सरकारी यंत्रणेला जाग येईल खरी पण त्यांची ही गांधीगिरी बऱ्याच जणांना भावली आणि आज गांधी जयंती निमित्त चर्चेचा विषय बनली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT