Paint Industry|Goa Dainik Gomantak
गोवा

Paint Industry: पाच वर्षांत पेंट उद्योग उलाढाल 1 लाख कोटींवर !

सध्या देशात पेंट उद्योगाची उलाढाल सुमारे 62 हजार कोटीची आहे.

दैनिक गोमन्तक

Paint Industry: देशातील पेंट आणि कोटिंग्स उद्योगाची सर्वोच्च संस्था भारतीय पेंट संघटनेची (आयपीए) पश्‍चिम क्षेत्रीय तीन दिवशीय 30 व 31वी परिषद गोव्यात काल 20 जानेवारीपासून सुरू झाली.

सध्या देशात या पेंट उद्योगाची उलाढाल सुमारे 62 हजार कोटीची आहे. या उद्योगाचा जलदगतीने होत असलेल्या विस्तारामुळे येत्या पाच वर्षात 1 लाख कोटींची होईल, अशी घोषणा ‘आयपीए’ने केली. ही पश्‍चिम क्षेत्र परिषद 22 जानेवारीपर्यंत दोना पावल येथील एका हॉटेलात सुरू आहे.

तीनदिवशीय परिषदेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे 21 रोजी उपस्थिती लावणार आहेत. भारतीय पेंट इंडस्ट्री सातत्याने सीएजीआरच्या दुहेरी अंकांनी वाढत आहे आणि नजीकच्या भविष्यात हा ट्रेंड कायम राहण्याची अपेक्षा आहे.

गोव्याचे पेंट आणि कोटिंग्ज मार्केट वाढत्या उत्पन्नाच्या पातळीमुळे आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे अभूतपूर्व तेजीचे साक्षीदार आहे. भारतातील आणि जगभरातील पेंट्स आणि कोटिंग्स इकोसिस्टममधील सुमारे 700 प्रतिनिधी परिषदेत सहभागी झाले आहेत.

आघाडीचे व्यावसायिक, तंत्रज्ज्ञ आणि इतर तज्ज्ञांचा समावेश असलेले 40 हून अधिक पॅनेल संबंधित विषयांच्या श्रेणीवर दृष्टीक्षेप टाकणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष अशोक गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी परिषदेच्या संयोजक प्रिया भूमकर, जशन भूमकर, अमित सिंगल, अनुज जैन, अभिजीत रॉय उपस्थित होते.

नावीन्यपूर्ण दृष्टिकोनावर भर !

‘न्यूटेशन’ ही थीम पेंट व्यवसायाच्या पुनर्कल्पनेवर आधारित आहे. या परिषदेत भारत आणि परदेशातील पेंट्स आणि कोटिंग्स इकोसिस्टमबाबत विचारमंथन केले जाईल. आजच्या गतिमान काळात या क्षेत्राच्या शाश्वत वाढीसाठी ‘पुनर्कल्पना’ किंवा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन स्वीकारण्यावर परिषदेचा भर असेल.

भारतीय पेंट उद्योगाने ऐतिहासिकदृष्ट्या भारताच्या जीडीपी वाढीला मदत केली आहे. पायाभूत सुविधांच्या जलद वाढीमुळे गोवा हे भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे, ज्यामुळे पेंट्स आणि कोटिंग्जच्या बाजारपेठेच्या विस्ताराला चालना मिळते, असे मत संघटनेचे उपाध्यक्ष जेसन गोन्साल्विस यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: 13 वर्षीय वैभवसाठी राजस्थानने मोजले 1.1 कोटी

Quepem Crime: राहत्या घरात आढळला महिलेचा मृतदेह, केपे पोलिसांची त्वरित कारवाई; मध्य प्रदेशात आरोपीच्या मुसक्या आवळल्या

गोवा विद्यापीठातही Job Scam! समित्यांमध्ये केरळीयनांची नियुक्ती; गोवा फॉरवर्डचा घणाघात

Goa BJP: महायुतीच्या यशात गोव्याचा 'लक फॅक्टर'! सावंत, राणेंचा प्रचार ठरला लाभदायी

Goa Bank Fraud: गोव्यात हातचलाखी करून खातेदारांना लाखोंची टोपी! महिला बँक कर्मचाऱ्यास अटक; पोलिस निरीक्षकाची तपासात हलगर्जी

SCROLL FOR NEXT