Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa News: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गोव्यातही पोलिस अलर्ट मोडवर, सुरक्षा वाढवली

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यातील सुरक्षा वाढवून सर्वांना अलर्ट करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

Pramod Yadav

पणजी: जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे मंगळवारी (२२ एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये पोलिसांना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली आहे. एलओसी आणि सीमाभागातही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मुंबई आणि दिल्लीत सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. गोव्यात देखील सुरक्षा वाढविण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथील मंत्रालयात घेतलेल्या मंत्रिमंडळात बोलताना याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री सावंत यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना मृतांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच, जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

"गोवा किनारी आणि पर्यटन राज्य असल्याने राज्यातील पोलिस नेहमीच सतर्क असतात. पण, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यातील सुरक्षा वाढवून सर्वांना अलर्ट करण्यात आले आहे", असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

"दहशतवाद्यांनी टार्गेट केलेल्या पहलगाम येथे गोव्यातील तीन जोडपे होते पण, १५ मिनिटांपूर्वीच ते त्याठिकाणाहून बाहेर पडल्याने ते बचावले. दरम्यान, जम्मू काश्मीर मधील विविध ठिकाणी गोव्यातील २६ लोक आहेत. त्या लोकांनी आम्हाला संपर्क केला शिवाय आम्ही देखील त्या लोकांना संपर्क केला आहे. त्या लोकांना सर्वोतोपरी सहकार्य आम्ही करत आहोत", असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. "धर्म विचारुन गोळीबार करणे हे खेदजनक असून, गोवा सरकार याचा तीव्र निषेध करते", असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सावंत यांचा २४ एप्रिल रोजी वाढदिवस आहे. दरम्यान, या हल्ल्यामुळे त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच, यानिमित्त सर्व कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान, सेवाकार्य (मेडिकल कॅम्प) कार्यक्रम सुरुच असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT