(Padma Shri Award Announced Brahmeshanandacharya Swami and Brahmananda Shankhawalkar Dainik Gomantak
गोवा

ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी आणि ब्रह्मानंद शंखवाळकर यांचा गोवा राजभवनात गौरव

ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी आणि ब्रह्मानंद शंखवाळकर यांच्यावर राज्यभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई तसेच हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी आणि ब्रह्मानंद शंखवाळकर यांचा राजभवनात गौरव केला. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी आणि ब्रह्मानंद शंखवाळकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच गोवा राज्यासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत CM Pramod Sawant तसेच पक्षनेते सदानंद शेठ तानवडे यांनी देखील त्यांचा गौरव केला. शिवाय राज्यातील अनेक नेते मंडळींनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. (Padma Shri Award Announced Brahmeshanandacharya Swami and Brahmananda Shankhawalkar honored at goa Raj Bhavan)

शेकडो पीठांचे आचार्य श्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

श्री दत्त पद्मनाभ गुरुपीठाचे प्रमुख तथा धर्मभूषण श्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी हे लंडन येथील ब्रिटिश संसदेत शांतीचा राजदूत उपाधीने सन्मानित आहे. श्रीलंका येथे जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या महाबोधी सोसायटीकडून जागतिक शांतीदूत पुरस्कार, भारतातील शेकडो पीठांचे ब्रह्मेशानंदाचार्य आचार्य असून अखिल भारतीय संत समितीने धर्मभूषण या उपाधीने गौरविले. इटलीतील सूर्य चंद्र योग आश्रमाचे ते मानद अध्यक्ष असून द हिंदू धर्म आचार्य सभेचे प्रमुख आचार्य, जागतिक स्तरावरील बौद्ध व हिंदू यांना मार्गदर्शन करण्यासाठी हिंदू बौद्ध समन्वयक प्रधान आचार्य म्हणून कार्यरत आहेत.

ब्रह्मानंद शंखवाळकर यांची कामगिरी

गोमंतकीय क्रीडाक्षेत्रात `पद्मश्री`ने सन्मानित होणारे ब्रह्मानंद पहिलेच खेळाडू आहेत. यापूर्वी 1997 सालच्या अर्जुन पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली होती, तेव्हाही ते हा पुरस्कारप्राप्त पहिले गोमंतकीय क्रीडापटू ठरले होते. भारतीय फुटबॉलमधील सर्वोत्तम गोलरक्षकांत ब्रह्मानंद अव्वल आहेत.

पद्मश्रीसाठी निवड सुखद धक्का

'सर्वोत्तम कामगिरी हेच ध्येय नेहमी बाळगले. स्वतःला प्रेरित करण्यावरच माझा भर असतो. सर्वोत्कृष्ट बनण्याचीच स्वप्ने पाहिले. पद्मश्री (Padma Shri) पुरस्कार खूप सुखद आणि समाधान देणारा आहे,' असे ब्रह्मानंद यांनी ताळगाव येथील आपल्या निवासस्थानी प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा आनंद व्यक्त करताना सांगितले.

ब्रह्मानंद शंखवाळकर यांच्याविषयी...

  • भारतातील सर्वोत्तम फुटबॉल गोलरक्षकांपैकी एक

  • 1997 सालचा अर्जुन पुरस्कार, गोव्याचे पहिले क्रीडापटू

  • अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे दशकातील (1985-1995) सर्वोत्तम फुटबॉलपटू

  • दोन वेळा (1982-83 व 1983-84) संतोष करंडक विजेत्या गोव्याचे कर्णधार

  • भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार, 1975 मध्ये भारतातर्फे आंतरराष्ट्रीय पदार्पण

  • गोव्यातील पानवेल स्पोर्टस क्लब, साळगावकर क्लब, चर्चिल ब्रदर्स, अँडरसन मरिन संघाचे प्रतिनिधित्व (1971 ते 1995)

  • 1995 साली स्पर्धात्मक फुटबॉलमधून निवृत्ती, 50 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने

  • 1997 ते 2005 या कालावधीत भारतीय फुटबॉल संघाचे गोलरक्षक प्रशिक्षक

  • 2014 साली गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सेवेतून प्रशिक्षण संचालक या नात्याने निवृत्त

  • सेझा फुटबॉल अकादमीत विविध पदांवर कार्यरत

  • जुलै 2020 मध्ये गोवा फुटबॉल विकास मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

फुटबॉलपटू या नात्याने जिंकलेले करंडक

  • बांदोडकर गोल्ड ट्रॉफी : 1974, 1981, 1988

  • टीएफए शिल्ड : 1979, 1982

  • नेहरू कप : 1985

  • रोव्हर्स कप : 1990

  • फेडरेशन कप : 1988, 1989

  • संतोष करंडक : 1982-83, 1983-84

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT