Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Prawah : म्हादई - प्रवाह प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी पी. एम. स्कॉट यांची नियुक्ती

समितीची मुदत तीन महिन्यांची असणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील म्हादई पाणी वाटपासंदर्भात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने स्थापन केलेल्या म्हादई - प्रवाह प्राधिकरणासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पी.एम. स्कॉट यांची नियुक्ती केली आहे.

या समितीची मुदत तीन महिन्यांची असणार आहे. तसा आदेश जलशक्ती मंत्रालयाने आज जारी केला, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी विधानसभा अधिवेशनाच्या शून्य काळात सभागृहात दिली.

म्हादई जलविवाद लवादाने निर्णय देत 2018 मध्ये गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यांना म्हादई नदीचे पाणी वाटून दिले आहे. याप्रमाणे प्रत्येक राज्य पाणी वापरते की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी म्हादई जल व्यवस्थापन प्राधिकरण अर्थात ‘म्हादई प्रवाह’ची घोषणा केली होती.

या समितीच्या अध्यक्षपदी पी.एम. स्कॉट यांची नियुक्ती केली आहे. सचिवपदी अशोककुमार व्ही. तर सदस्यपदी वीरेंद्र शर्मा यांची निवड केली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

म्हादई प्रवाह लवादाने दिलेल्या निर्णयानुसार, म्हादई खोऱ्यातील पाण्याचे वाटप करेल. तसेच तीन राज्यांशी संबंधित विभागांवर तपशीलवार माहिती घेऊन निर्णय जाहीर करेल. म्हादईच्या पाण्याचे वितरण, वापर आणि नियंत्रणावर लक्ष ठेवेल. यांचा निर्णय तिन्ही राज्यांना बंधनकारक असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT