UK social work awards Dainik Gomantak
गोवा

Goans in UK: ब्रिटनमध्ये गोव्याचा डंका; 60 हून अधिक लोकांच्या सामाजिक कार्याचा गौरव

Goans honoured in UK: ब्रिटनमध्ये राहत असलेल्या ६० हून अधिक गोमंतकीयांचा त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल नुकताच गौरव करण्यात आला

Akshata Chhatre

लंडन: ब्रिटनमध्ये राहत असलेल्या ६० हून अधिक गोमंतकीयांचा त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. वेस्टमिन्स्टर पॅलेस येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात हा सन्मान सोहळा पार पडला. स्विंडनच्या लेबर पार्टीचे खासदार हेदी अलेक्झांडर आणि विल स्टोन यांच्यासह स्विंडनचे पहिले गोवेकर महापौर इम्तियाज शेख आणि त्यांची पत्नी व नगरसेविका एडोराबेले शेख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

रिकॉग्नेशन ऑफ द युके गोवन डिस्पोरा असे या कार्यक्रमाचे नाव होते. यूकेच्या सशस्त्र दल, वैद्यकीय क्षेत्र, अभियांत्रिकी, पोलीस दल, व्यवसाय, कॉर्पोरेट जग आणि हॉस्पिटॅलिटी यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तींचा या कार्यक्रमांत सन्मान करण्यात आला.

यामध्ये स्विंडन तसेच वेम्बली, साउथॉल, हेज आणि लंडनच्या इतर भागांतील गोवेकरांचा समावेश होता.

या कार्यक्रमात बोलताना स्विंडनच्या सेंट्रल वार्डच्या नगरसेविका आणि शिक्षण विभागाच्या कॅबिनेट सदस्य एडोराबेले शेख यांनी सांगितले की, वेस्टमिन्स्टर पॅलेसमध्ये यूकेमधील गोवेकरांचा आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करून इतिहास रचला गेला आहे.

"गोव्याच्या लोकांनी यूकेला आपलं घर मानलं आहे आणि ते यूकेच्या समृद्ध आणि विविध संस्कृतीत आपले योगदान देत आहेत." "स्विंडनच्या संसद सदस्य म्हणून मला हे चांगले ठाऊक आहे की गोव्याची लोकसंख्या आपल्या देशाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनात महत्त्वपूर्ण योगदान देते." असं खासदार हेदी अलेक्झांडर यांनी सांगितलं.

या कार्यक्रमामुळे यूकेमध्ये स्थायिक असलेल्या गोव्याच्या समुदायाला एक नवी ओळख मिळाली आहे आणि त्यांच्या कामाचा योग्य सन्मान झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT