Goa News: भाजपचे 'गाव चलो अभियान', आमदार देविया राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन; वाचा गोव्यातील दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi News: जाणून घ्या गोव्यातील ठळक घडामोडी. क्रीडा, मनोरंजन, राजकारण आणि इतर महत्वाच्या घडामोडी.
MLA Deviya Rane
MLA Deviya RaneDainik Gomantak
Published on
Updated on

भाजपचे 'गाव चलो अभियान', आमदार देविया राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन

भाजपच्या गाव चलो अभियान निमित्त आमदार डॉ. देविया राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्ये पंचायतीत विविध उपक्रम राबवण्यात आले. मोर्ले येथे तळ्यांची स्वच्छता, मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तसेच, केरी सत्तरी येथे चाय पर चर्चा, दोन्मद केरी येथे बूथ बैठक, तर शिरोली सत्तरी येथे पदयात्रा काढून नागरिकांचे प्रश्न ऐकून घेण्यात आले.

Goa Assembly Election 2027: आगामी विधानसभा निवडणुकीत 52 टक्के मते मिळवण्याचे लक्ष्य- प्रदेशाध्यक्ष दामू नाईक

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपने आतापासूनच सुरु केली आहे. यातच आता, येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला आपला मतदानाचा वाटा 33 टक्क्यांवरुन 52 टक्क्यांपर्यंत वाढवायचा आहे. आपण सर्वांना एकत्र घेवून ही निवडणुक लढवणार आहोत. 52 टक्के मते मिळवण्यासाठी आपण 40 जागा लढवू, असे राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.

Pramod Sawant: घर दरुस्तीस ३ दिवसांत परवानगी

राज्यभरातील अनियमित बांधकामावर कारवाईची टांगती तलवार नाही, असे दर्शविण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. गाव पातळीवरील पाच वर्षे जुन्या घरांच्या दुरुस्तीसाठी आता केवळ पंचायत सचिवच तीन दिवसात परवानगी देईल, असा निर्णय सरकारने घेतला आहे.

Goa Accident: कुळे पंचायत क्षेत्रातील घरावर माड घरावर माड पडल्याने नुकसान

कुळे पंचायत क्षेत्रातील नववाडा येथील प्रशांत देवीदास यांच्या घरावर रात्री १२-३० वाजता माड पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कुळे शिगाव तसेच संबंधित खात्याने आमचे जे नुकसान झाले आहे त्यासाठी आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी केली आहे.

Margao Fire: मडगावात ला फ्लोअर हॉटेलसमोरील चाळीला आग

Unified Pension Scheme: सावंत सरकारने तयार केलेली युनिफाइड पेन्शन योजना केंद्राने स्वीकारली

सावंत सरकारकडून निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेली युनिफाइड पेन्शन योजना केंद्र सरकारने अधिकृतरित्या स्वीकारली. निवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅज्युइटी सारखे लाभ मिळावेत यासाठी सरकारने ही योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बजेटमध्ये या योजनेची घोषणा केली.

Goa Crime: करवाढीच्या मुद्द्यावरून जोरदार वाद

फेब्रुवारीमध्ये परिषदेने घेतलेल्या निर्णयाशी सुसंगत नसलेल्या सुधारित शुल्क दरांना आक्षेप घेत मडगावच्या करदात्यांनी एमएमसीसमोर निदर्शने केली. ही वाढ त्वरित मागे घ्यावी आणि एप्रिलपासून आजपर्यंत जनतेकडून वसूल केलेले अतिरिक्त पैसे परत करावेत अशी त्यांची मागणी आहे.

Goa Cabinet: पंचायत क्षेत्रातील जुन्या घरांच्या दुरुस्तीसाठी आता थेट परवानगी

अस्तित्वात असलेल्या जुन्या घरांच्या दुरुस्तीसाठी आता पंचायत सचीव देणार परवानगी. तीन दिवसात परवानगी देणे बंधनकाराक. आधी बीडीओ व इतर ठिकाणी घ्यावी लागत होती परवानगी. अर्जदाराला पाच वर्षांची भरलेली घरपट्टी तसेच दुरुस्ती प्लॅन करावा लागणार सादर. मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयाची मुख्यमंत्र्यांकडून माहिती.

Illegal Constructions: " माविन गुदिन्होच्या मतदारसंघात सर्वाधिक बेकायदेशीर बांधकामे" आरजीपी प्रमुख मनोज परब यांनी पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांच्यावर केली टीका

आरजीपी प्रमुख मनोज परब यांनी पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांच्यावर टीका केली आहे. माविन गुदिन्होच्या मतदारसंघात सर्वाधिक बेकायदेशीर बांधकामे आहेत त्यावर आधी लक्ष द्यावे.अनधिकृत बांधकामे पाडण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन आरजीपी प्रमुख मनोज परब यांनी केले आहे.

Goa-Mumbai: समुद्रीमार्गाने गोव्याहून फक्त सहा तासांत गाठता येणार मुंबई

एम२एम या कंपनीकडून अति जलद गतीने रो-रो सेवा सुरु करण्यात येणार आहे. १८० वर्ष जुनी वाहतूक पुन्हा सुरु होणार.

Goa News: तुये नवीन हॉस्पिटल इमारतीवर जुन्या तुये सामुदायिक आरोग्य केंद्राचा फलक

तुये नवीन हॉस्पिटल इमारतीवर जुन्या तुये सामुदायिक आरोग्य केंद्राचा फलक लावला होता,नागरिकांनी आवाज उठवल्यामुळे हा फलक हटवण्यात आला. तुये येथील नवीन हॉस्पिटल 100 खाटांचे सुरू करून ते बांबोळी हॉस्पिटलला लिंक करण्याची योजना आहे,परत मधल्या मधी जून सामुदायिक आरोग्य केंद्र या इमारतीत स्थलांतरित करतात की काय ,त्यासाठी फलक लावला होता

Quepem Accident: केपे येथे अपघात; २ जण जखमी

केपे येथे दोन दुचाकींमध्ये अपघात झाला. दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे. सध्या पोलिस याचा अधिक तपास करत आहेत.

'त्या' आयएफएस अधिकाऱ्याला पाठवणार कारणे दाखवा नोटीस!

सरकारला कल्पना न देताच बोंडला प्राणीसंग्रहालय सुमारे महिनाभर बंद ठेवण्याचा आदेश दिलेल्या आयएफएस अधिकारी नवीन कुमार यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याच आदेश देण्यात आलाय‌. रान मांजरांच्या ५ प्रजाती मरण पावल्याच्या पार्श्वभूमीवर प्राणी संग्रहालयात बंद ठेवण्यात आले. त्याची माहिती सरकारला देणे आवश्यक होते. ह्याबाबतचा सखोल चौकशी अहवाल केंद्राला सादर करुन आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. वन मंत्री विश्वजीत राणेंची माहिती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com