गोव्यातील वागातोर,हरमल समुद्र किनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांनी 100 हून अधिक अंडी दिल्याची घटना घडली असून समुद्री जीव अभ्यासकांसाठी हे आशादायी चित्र मानले जाते. या अगोदर आश्वे आणि मोरजी येथीलसमुद्र किनारी भागात कासवाने अंडी घातल्याची घटना घडली होती. (Olive Ridley Turtles)
समुद्रकिना-यावर सुरक्षितता आणि गस्त घालण्यासाठी रात्रीच्या वेळी तैनात केलेले जीवरक्षक आणि बीच सेफ्टी पेट्रोल (BSP) कर्मचार्यांना या समुद्रकिनाऱ्यांवर पसरलेली 100 पेक्षा जास्त अंडी सापडली असून त्यांनी ही कासवाची अंडी वनविभागाकडे सुपूर्द केली जाणार आहेत.
खरं तर आश्वे, मोरजी हे समुद्र किनारे कासवांच्या घरट्यासाठी प्रसिद्ध असलेले समुद्र किनारे म्हणून ओळखले जातात. या संबंधी वन आणि नगरविकास मंत्री विश्वजीत राणे यांनी संपूर्ण मोरजी समुद्र किनारा विकासासाठी निर्बंधित क्षेत्र म्हणून जाहीर करावे, अशी केंद्राकडे मागणी करणार असल्याची देखील माहिती दिली होती.
यावेळी कासवांना या पारंपरिक ठिकाणी अंडी न देता वागातोर,हरमल किनारी अंडी दिल्याने आश्चर्य व्यक्त होतेय.
दृष्टी मरीनचे ऑपरेशनचे हेड नवीन अवस्थी यांनी सांगितले की, माणसांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे समुद्री कासवे त्यांच्या नेहमीच्या घरट्यांकडे अंडी न घालता इतर समुद्रकिनाऱ्यांकडे जात आहेत.
त्यामुळे त्यांनी सर्वांना असे आवाहन केले आहे कि, समुद्रकिनाऱ्यांवरील कासवांच्या घरट्यांजवळ जवळ येण्याचे टाळावे, त्यांच्या अधिवासात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.