Revolutionary Goans  Dainik Gomantak
गोवा

आमचा एकमेव आमदार गोमंतकीयांचा आवाज विधानसभेत पोहोचविणार; मनोज परब

उमेदवारांची यादी पुढील आठवड्यापर्यंत जाहीर करणार : मनोज परब

दैनिक गोमन्तक

सासष्टी: विधानसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश संपादन केलेला रिव्होल्युशनरी गोवन्‍स (आरजी) हा पक्ष आता पंचायत निवडणुकीच्‍या तयारीला लागला आहे. ही निवडणूक पक्षीय पातळीवर जरी होणार नसली तरी आपला पक्ष या निवडणुकीत योग्य त्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करील व त्याची यादी पुढील आठवड्यापर्यंत जाहीर केली जाईल, असे ‘आरजी’चे अध्यक्ष मनोज परब यांनी मडगावात आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

(our MLA will convey voice of Gomantakiya in the Assembly Manoj Parab's statement)

विधानसभा निवडणुकीत ‘स्मार्ट व्हिलेज’ ही संकल्पना आपल्या पक्षाने जाहीरनाम्यात नमूद केली होती. त्याच अनुषंगाने आम्ही पंचायत निवडणुकीत जेथे आपल्या पक्षाला जास्त पाठिंबा मिळू शकेल असे प्रभाग शोधून तेथे समविचारी पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करू, असे परब म्‍हणाले. पंचायत स्तरावरील प्रशासन आम्हाला स्वच्छ आणि पारदर्शी करायचे आहे. सर्व पंचायती स्वयंपूर्ण करावयाच्‍या आहेत. पंचायत हा लोकशाहीचा पाया असून तो मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न असेल. पण एक मात्र खरे आपला पक्ष अप्रत्यक्ष तरी पंचायत निवडणुकीच्‍या रिंगणात उतरणार आहे, असे परब यांनी ठामपणे सांगितले.

गोमंतकीयांचा आवाज विधानसभेत पोचवणार

सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात आमचा एकमेव आमदार गोमंतकीयांचा आवाज पोहोचविणार आहे. आम्ही कित्येक विधेयके, ठराव विधानसभेसाठी पाठविले होते. मात्र विधानसभेचा कार्यकाळ 25 वरुन 10 दिवसांवर आणल्याने आम्हाला आता या सर्वांचा पुनर्विचार करावा लागत आहे. पोगो विधेयक हे गोमंतकीयांची खरी ओळख दर्शविणारे आहे. खरा गोमंतकीय कोण हे स्पष्ट व्हायला पाहिजे व ते स्पष्ट करण्याची जबाबदारी सरकारची आहे. परराज्यांतील लोक इथे येऊन स्वत:ला गोमंतकीय म्हणत आहेत. हे आम्ही कसे खपवून घेऊ, असा सवाल करून जर सरकार गंभीर असेल तर त्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला पाहिजे, असे मनोज परब म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT