Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: अन्यथा थिवीतून विधानसभा निवडणूक लढवली असती!- तानावडे

विशिष्ट निवडणूक डोळ्यांसमोर किंवा वैयक्तिक स्वार्थ पाहून मी कार्यक्रमांना जात नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

मी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावतोय, हे खरे असले तरी तो पक्षाच्या कामाचा भाग आहे. त्यामुळे विशिष्ट निवडणूक डोळ्यांसमोर किंवा वैयक्तिक स्वार्थ पाहून मी कार्यक्रमांना जात नाही. निवडणुकीसाठी इच्छुक असतो तर गेल्या विधानसभेवेळी थिवीतून लढलो असतो, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

2024 ची लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने तुम्ही अधिक सक्रियपणे सध्या सर्वत्र कार्यक्रमांना हजेरी लावतात. तसेच तुमच्या भेटीगाठी वाढल्या आहेत, असे पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी हे विधान केले.

शुक्रवारी (ता.१०) म्हापशात शिवजयंती कार्यक्रमानंतर ते बोलत होते. मी उत्तर गोव्याला प्राधान्य देतोय, असे मुळीच नाही. प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून मी सर्व 40 मतदारसंघ माझेच मानतो, असे सांगत तानावडे यांनी लोकसभेबाबत ‘नरो वा कुंजरोवा’ भूमिका स्पष्ट केली.

श्रीपादभाऊंच्या विषयाला बगल

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना लोकसभा निवडणुकीसाठी डावलण्याचा प्रयत्न केला जातोय का, असे विचारले असता तानावडे म्हणाले की, श्रीपादभाऊ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून ते उत्तमरित्या कार्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा विषय येत नाही.

उमेदवारी ही निवडणुकीवेळी ठरविली जाते. काही वर्तमानपत्रांनी मी थिवीमधून इच्छुक आहे, असे वृत्त प्रसिद्ध केले आहे. तसे असते तर गेली विधानसभा निवडणूक मी थिवीतून लढलो असतो, असे सांगत तानावडे यांनी या प्रश्नाला बगल दिली.

प्रत्येक निवडणूक जिंकणे, हे आमचे ध्येय आहे. परमेश्वराची साथ लाभल्याने माझ्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या काळात भाजपने पंचायत, झेडपी, पालिका तसेच विधानसभा निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे येणारी लोकसभा निवडणूक जिंकत उत्तर व दक्षिण गोव्यात कमळ फुलविणे हे आमचे लक्ष्य आहे.

- सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT