Sonsodo Wall Collasped Dainik Gomantak
गोवा

सोनसोडो कचरा प्रकल्पाची भिंत पुन्हा कोसळली

यापूर्वी 25 मार्चला या प्रकल्पाची एकाबाजूची भिंत आत साठविलेल्या कचऱ्याच्या वजनाने कोसळली होती. आता दुसऱ्या बाजूची भिंत कोसळली आहे.

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : सोनसोडो कचरा यार्डावरील प्रक्रिया प्रकल्पाची भिंत आज दुपारी पुन्हा कोसळण्याची घटना घडली. यापूर्वी 25 मार्चला या प्रकल्पाची एकाबाजूची भिंत आत साठविलेल्या कचऱ्याच्या वजनाने कोसळली होती. आता दुसऱ्या बाजूची भिंत कोसळली आहे. मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी रोहित कदम यांना याबद्दल विचारले असता त्यांनी वृताला दुजोरा दिला. मागच्या काही दिवसात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ही भिंत खचली असावी असे ते म्हणाले.

दरम्यान यापूर्वी सोनसोडो कचरा यार्डवर कचरा प्रक्रिया करण्यात येत असलेल्या शेडमध्ये कचरा वाढल्याने 25 मार्च रोजी या शेडजवळ असलेली भिंत कोसळली होती. या घटनेने कचरा विल्हेवाटी बद्दलची मडगाव पालिकेची अनास्था पुन्हा चव्हाट्यावर आली होती. एका बाजूचे भिंतीचा कठडा कोसळला असल्याने कचरावाहू ट्रक आणि कोपॅक्टरना नियोजित ठिकाणी कचरा टाकण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे. आता दुसऱ्या बाजूचीही भिंत कोसळल्याने मोठा प्रश्न उभा राहणार आहे.

सोनसोडो कचरा विल्हेवाट केव्हापर्यंत पूर्ण होईल याचे वेळापत्रक त्वरित द्या, असे तोंडी निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले होते. मे. हिंदुस्तान वेस्ट ट्रिटमेंट प्रा. लि., कंपनीने कामासंदर्भात दिलेली माहिती समाधानकारक नाही. हे काम वेळेत न करण्याचे वा ते पूर्ण न करण्याच्या सबब दिल्या जात असल्याची टिप्पणी आदेशात केली होती.

दरम्यान सोनसोडो येथे नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासाठी पालिकेच्या मालकीची 15 हजार चौ. मी जागा घन कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या ताब्यात देण्याचा ठराव मडगाव पालिकेच्या बैठकीत संमत करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT