Jnanpith awardee Damodar Mauzo  Dainik Gomantak
गोवा

गोवा राजभाषा कायद्यात मराठी नको म्हणाणाऱ्या दामोदर मावजो यांची अभिजात दर्जानंतर पहिली प्रतिक्रिया; स्पृश्य - अस्पृश्यतेचा केला उल्लेख

Pramod Yadav

Marathi Classical Language Status

पणजी: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय गुरुवारी (०३ ऑक्टोबर) रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मराठीला मिळालेल्या अभिजात दर्जावरुन सर्वत्र आनंद साजरा केला जात असताना गोव्यातील कोकणी लेखक दामोदर मावजो यांनी मराठी हा दर्जा मिळण्यास विलंब झाल्याचे वक्तव्य केले. तसेच, अभिजात दर्जामुळे स्पृश्य - अस्पृश्यता वाढेल, असेही ते म्हणाले.

मराठीला अभिजात दर्जा मिळण्यास उशीर झाल्याचे मत कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांनी व्यक्त केले. तसेच, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यास उशीर झाल्याचे मावजो म्हणाले.

विकसित भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देणे म्हणजे इतर भाषांना कमी लेखण्यासारखं आहे, असे माझे ठाम मत आहे. अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने स्पृश्य - अस्पृश्यता वाढीस लागण्यासारखे आहे, असेही दामोदर मावजो म्हणाले.

काही दिवसांपूर्वी मावजो यांनी गोव्याच्या राजभाषा कायद्यात मराठीचा समावेश नको, असे वादग्रस्‍त विधान केल्याने वाद झाला होता. मावजोंच्या या विधानाचा मराठीप्रेमींनी तीव्र निषेध व्यक्त केला होता. तसेच, मावजो यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली होती.

दरम्यान, मराठीला अभिजात दर्जा जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शुभेच्छा दिल्या होत्या.

'मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल,' अशा शब्दात मोदींनी शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील, 'अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.'

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील याबाबत शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी भाषेच्या अनेक शतकांच्या इतिहासात राज्यातील अनेक साहित्यकार, भाषाकोविदांनी मराठीच्या विकासात, सृजनात महत्वपूर्ण योगदान दिले आहे आणि पुढे देत राहणार आहेत याची मला खात्री आहे. अभिजात भाषा दर्जामुळे मराठीच्या राष्ट्रीय पातळीवरील विकासाला अधिक हातभार लागणार आहे. सर्व मराठी भाषा प्रेमी, आणि सर्जक यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, असे सावंत म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sand Mining: गोव्यात बांधकामांना आता 'अच्छे दिन' 'मांडवी', 'झुआरी'त रेती उपशास मुभा; दरावरही येणार नियंत्रण

कोने, प्रियोळ येथे भीषण अपघातात एक ठार; दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी 4 अपघात, गोव्यातील ठळक बातम्या

Goa News: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्प्रिंगबोर्ड टॅबलेटचे वाटप

सुभाष वेलिंगकरांना अटक होणार का? गोव्यात कॅथलिक समाज आक्रमक, पोलिस स्थानकांवर निदर्शने

Mhadei Water Dispute: कर्नाटककडून पाणी वळविण्याचे काम पुन्हा सुरू, प्रमोद सावंतांना म्हादईपेक्षा खुर्चीची जास्त चिंता; युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT