Guru Purnima program in School Dainik Gomantak
गोवा

Goa: डिचोलीतील सरकारी प्राथमिक शाळेत विविध उपक्रमाचे आयोजन

प्राथमिक सरकारी शाळा शिरगाव डिचोली (Bicholim) मार्फत आपण शालेय अभ्यासक्रमा अंतर्गत विविध निसर्गसंरक्षणाचे (Nature conservation) उपक्रम विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतूम ज्ञान मिळण्यासाठी राबत असतो.

Nivrutti Shirodkar

मोरजी - प्राथमिक सरकारी शाळा शिरगाव डिचोली (Bicholim) मार्फत आपण शालेय अभ्यासक्रमा अंतर्गत विविध निसर्गसंरक्षणाचे (Nature conservation) उपक्रम विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतूम ज्ञान मिळण्यासाठी राबत असतो. विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्व उपक्रमांची दखल उच्चाधिकारी, सामाजिक संस्था व वृत्तपत्रातून ही घेतली आहे हे आमच्या 30 विद्यार्थांचे सुयश आम्हा शिक्षकांना प्रेरणादायक ठरते. आज गुरु पौर्णिमा (Guru Purnima) निसर्ग हा सर्वोत्तम गुरु असेच म्हणावे लागेल या गुरुचे पूजन आपण स्वच्छ भारत अभियाना (Swachh Bharat Mission) अंतर्गत एक नवा अभिनव उपक्रम करुया करुया. तुम्ही तयार आहात ना विद्यार्थ्यांनो ! (Organizing various activities at Government Primary School in Bicholim)

आपण गोवभर फिरताना सर्वत्र आपणास प्लस्टिकचा कचरा पडलेला दिसतो. गोवा हे पर्यटन स्थळ म्हणून देशाविदेशात प्रसिद्ध आहे .भावी पिढी म्हणून गोवा स्वच्छ ठेवणे व त्यासाठी स्वतःवर योग्य संस्कार करण्याची आपलीच जबाबदारी आहे. आपण आपल्या क्षमतेचा नुसार स्वच्छ भारत अभियानात खारीचा वाटा घेणार आहोत. त्यासाठी बाहेर कुठेही न जाता आपण कोरोना काळात सर्व नियम पाळून घरात राहूनच हा उपक्रम करणार आहोत. घर ते कचराकुंडी या मधील प्लस्टिकच्या प्रवासात आपण एक महत्वाची भुमिका निभावणार आहोत. यासाठी आपणास लागणारे अदृष्य गोष्ट म्हणजे दृढ निश्चित व घरातील 1 किंवा 2 लिटरची प्लस्टिकची बाटली.

अशा बाटल्या तयार करुन आपण खुप मोठी राष्ट्र सेवा व निसर्गसेवा करणार आहोत. समजा एका बाटलीत 100 प्लस्टिकची रिकामी पाकिटे भरली तर हीच प्लस्टिक पाकिटे कचऱ्यात इतस्ततः न जाता एका बाटलीत बंद होतील हाच आपला मुख्य उद्देश यातून साध्य होईल. कचरा गोळा करणाऱ्या कर्मचारी वर्गासही आपण यामुळे खुप मोठे सहकार्य करणार आहेत.

चला ! तर विद्यार्थ्यांनो नवा उपक्रम नव्या उत्साहने करुया!

आणि आनंदाची गोष्ट म्हणजे जो विद्यार्थी ( इयत्ता 1ते 4 ) सर्वात जास्त अशा स्वरूपाच्या सर्वात जास्त संख्येत बाटल्या तयार करेल ( घरातील प्लस्टिक गोळा करुन) त्यास 1000/- बक्षीस निसर्गप्रेमी कै.अशोक अप्पासाहेब कुलकर्णी (डोंबिवली मुंबई) यांच्या स्मरणार्थ देण्यात येतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT