Bodybuilding Dainik Gomantak
गोवा

गोव्यामध्ये बॉडीबिल्डिंग स्पर्धेचे आयोजन!

गोवा बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री कृष्णा (दाजी) साळकर यांनी नंतर पत्रकार परिषद घेऊन सदर स्पर्धेविषयी माहिती दिली.

दैनिक गोमन्तक

वास्को : दुसरी गोवा (Goa) बॉडीबिल्डिंग (Bodybuilding) आणि पुरुषांची शारीरिक राज्यस्तरीय अजिंक्यपद मिस्टर वास्को 2021 स्पर्धेचे वीरेश हिरेमठ यांनी जीडीसीसी मार्केटींग आणि व्यवस्थापन, दुबई (Dubai) यांच्या सौजन्याने सदर स्पर्धा आयोजित केली आहे. चषकाचे अनावरण हाॅटेल एचक्यू येथे करण्यात आले. गोवा बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री कृष्णा (दाजी) साळकर यांनी नंतर पत्रकार परिषद घेऊन सदर स्पर्धेविषयी माहिती दिली. 12 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी 6.30 वाजता गोवा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या अंतर्गत फिजिक चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन मुरगाव नगरपालिका इमारतीसमोर करण्यात आले असून प्रमुख पाहुणे म्हणून परिवहन आणि पंचायत मंत्री श्री. मौविन गुदिन्हो उपस्थित राहणार आहे.

या स्पर्धेत टायटल मिस्टर वास्कोला ट्रॉफी आणि प्रमाणपत्रासह 30000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल. 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो आणि 75 किलो अधिकसाठी श्रेणी निहाय बक्षिसे असतील. प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकास रु. 10000, द्वितीय क्रमांकास 8000, तृतीय क्रमांकास 6000, चौथ्या क्रमांकास 3000 व पाचव्या क्रमांकास 2000 चषक व प्रमाणपत्रांसह बक्षीस देण्यात येईल. पत्रकार परिषदेस (Press conference) संघटनेचे अध्यक्ष - श्री. कृष्ण (दाजी) साळकर, आयोजक - श्री. वीरेश हिरेमठ, प्रायोजक - प्रतिनिधी श्री. सचिन यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी श्री. मोहम्मद उझैर, बॉडीबिल्डिंग प्रशिक्षक - रवी देसाई संयोजक - संतोष मापशेकर,आयोजन सचिव- श्री मोहिझ खान उपस्थित होते.

दुसरी गोवा बॉडीबिल्डिंग आणि पुरुषांची शारीरिक राज्यस्तरीय अजिंक्यपद मिस्टर वास्को 2021 चषकाचे अनावरण करताना गोवा बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री कृष्णा (दाजी) साळकर.बाजूस आयोजक - श्री. वीरेश हिरेमठ, प्रायोजक - प्रतिनिधी श्री. सचिन, श्री. मोहम्मद उझैर, बॉडीबिल्डिंग प्रशिक्षक - रवी देसाई संयोजक - संतोष मापशेकर,आयोजन सचिव- श्री मोहिझ खान.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

Goa Opposition Alliance: महाआघाडी झाली तरी जागावाटपाचा तिढा सुटणार कसा? समान कार्यक्रमाशिवाय आघाडीचे भविष्य अंधारात; सरदेसाईंच्या समीकरणांवरुन संभ्रम!

SCROLL FOR NEXT