Azadi Ka Amrit Mohotsav Dainik Gomantak
गोवा

'हर घर तिरंगा मोहिमे' अंतर्गत पणजीतील मांडवी नदीवर तिरंगा बोट रॅली

केंद्रीय दळणवळण विभाग गोवा, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, हर घर तिरंगा मोहिमेचा एक भाग म्हणून रविवारी तिरंगा बोट रॅलीचे आयोजन केले होते

दैनिक गोमन्तक

गोवा: भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त "हरघर तिरंगा मोहिमेचा" भाग म्हणून पणजीतील मांडवी नदीवर तिरंगा बोट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय दळणवळण विभाग गोवा, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, हर घर तिरंगा मोहिमेचा एक भाग म्हणून रविवारी तिरंगा बोट रॅलीचे आयोजन केले होते, भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त, 75 तिरंगा असलेले 75 लोक मांडवी नदीतून 75 मिनिटे हर घर तिरंगा ब्रँडिंगने सजवलेल्या क्रूझवर प्रवास केला. यादरम्यान, सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले.

(Organized national flag Boat Rally on Mandvi River in Panaji under 'Har Ghar Tiranga Campaign')

‘आझादी का अमृत महोत्सव’च्या निमित्ताने हर घर तिरंगा, तिरंगा रॅली, मोटारसायकल रॅली, मूक रॅली, ऐतिहासिक वारसा स्थळांवर ध्वजारोहण, शाळा, महाविद्यालय यांच्यामार्फत प्रभात फेरी, विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. गुरुवार, 11 रोजी आग्वाद कारागृह संग्रहालयावर ध्वजारोहण करण्यात आले दरम्यान, स्वातंत्र्यसैनिकांचा गौरवही करण्यात आला. राज्यात 13 ते 15 ऑगस्टदरम्यान भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

14 ऑगस्ट रोजी विभाजन हुतात्मा स्मरण दिवस

14 ऑगस्ट रोजी विभाजन हुतात्मा स्मरण दिवस पाळला जाणार आहे. यासाठी पणजी आणि म्हापसा बस स्टॅण्डवर फोटो आणि पोस्टर प्रदर्शन होत आहे. हे प्रदर्शन पुरातत्व आणि अभिलेख खात्याच्या वतीने भरवण्यात येणार आहे. चर्च स्क्वेअर ते आझाद मैदान आणि वास्को येथे मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. तर 15 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्वच 12 ही तालुक्यांच्या ठिकाणी मंत्री आणि आमदार ध्वजारोहण करतील. यानिमित्ताने माहिती आणि प्रसिद्धी खात्याने स्पर्धांचे आयोजन केले आहे.

भाजप कार्यालयातून मोफत तिरंगा

आर्थिक समस्यांमुळे राष्ट्रध्वज विकत घेणे शक्य नाही त्यांनी भाजप कार्यालयातून मोफत तिरंगा घेऊन हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी व्हावे आवाहन सुभाष फळदेसाई यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना13 ते 14 ऑगस्ट दरम्यान घरोघरी राष्ट्रध्वज फडकावून किंवा प्रदर्शित करून 'हर घर तिरंगा' चळवळ मजबूत करण्याचे आवाहन केले. ट्विट करत ते म्हणाले की या चळवळीमुळे तिरंग्याशी आमचा संबंध अधिक दृढ होईल आणि त्यांनी नमूद केले की 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT