Bus Stand  Dainik Gomantak
गोवा

मडगाव बसस्थानकावरील स्टॉल हटविण्याचा आदेश

दिलेल्या मुदतीत तो न हटविल्यास कायद्यानुसार पालिका तो हटविणार आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: मडगाव कदंब बसस्थानकावरील पार्किंग लॉटमध्ये विनापरवाना उभारला गेलेला चहाचा स्‍टॉल पंधरा दिवसांत हटविण्यात यावा, असा आदेश मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी आज दिला.

या प्रकरणी ‘गोवा कॅन’कडून तक्रार आल्यावर संबंधितांना कारणे दाखवा नोटीस जारी केली असता सदर स्‍टॉल नगरपालिका वा एसजीपीडीएकडून परवाना न घेता उभारल्याचे दिसून आले. त्‍यामुळे दिलेल्या मुदतीत तो न हटविल्यास कायद्यानुसार पालिका तो हटविणार आहे.

दरम्यान, ‘गोवा कॅन’चे रोलंड मार्टिन्‍स यांनी मुख्याधिकाऱ्यांच्‍या आदेशाचे स्वागत करताना बसस्थानकासारख्या ठिकाणी अशा प्रकारे उभारलेल्या स्‍टाल्‍समुळे सार्वजनिक सुरक्षेची समस्या उभी राहते असे सांगून वाहतूक खाते व कदंब परिवहन मंडळानेही सदर बाब लक्षात घेण्याची गरज प्रतिपादली. म्हापसा, पणजी व वास्कोत असे स्‍टॉल्‍स खुलेआम उभारण्‍यात आले असून, तेसुद्धा हटवावेत अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT