Order of the Department of Higher Education to inspect students under stress  Dainik Gomantak
गोवा

दक्षिण गोव्यातील सरकारी महाविद्यालय चर्चेत; चौकशीसाठी समुपदेशकांची नेमणूक

पथक लवकरच या महाविद्यालयाला भेट देणार

दैनिक गोमन्तक

मडगाव : दक्षिण गोव्यातील एका सरकारी महाविद्यालयात विद्यार्थिनीमध्ये आत्महत्या करण्याची प्रवृत्ती वाढली आहे, अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर या वृत्ताची सत्यता पडताळून पाहण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाने त्या महाविद्यालयात समुपदेशकांचे पथक पाठवून चौकशी करण्याचे ठरविले आहे.

या महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने तीन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर याच विद्यार्थिनीच्या वर्गातील अन्य दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारचे वृत्त असून तीन दिवसापूर्वी महाविद्यालयातच एक विद्यार्थिनी विचित्र वागू लागू लागल्याने तिला एमबुलन्स बोलावून रूग्णालयात दाखल करावे लागले होते. या घटनांमुळे हे महाविद्यालय सध्या चर्चेत आले आहे.

हे विद्यार्थी कदाचित मानसिक तणावाखाली असल्याने हे असे प्रकार घडले असावेत असे बोलले जात आहे. मात्र या संबंधी पोलिसात कुठलीही तक्रार कुणी केलेली नाही. या सर्व गोष्टींची दखल घेऊन आज उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर यांनी त्यांच्या खात्या अंतर्गत नेमलेल्या समुपदेशकांची एक तातडीची बैठक बोलावली. त्या महाविद्यालयात जाऊन चौकशी करून सत्यता अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हे पथक लवकरच या महाविद्यालयाला भेट देणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान, हा प्रकार लैंगिक शोषणाचा प्रकार तर नव्हे ना याची खात्री करून घेण्यासाठी लैंगिक शोषण प्रतिबंध समितीच्या सदस्य आवदा व्हिएगस यांनी आज या महाविद्यालयाला भेट दिली. मात्र आपल्याला या शक्यतेत काही तथ्य आढळून आले नाही असे त्यानी 'गोमंतक' ला सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT