Illegal Construction Dainik Gomantak
गोवा

Illegal Construction: बेकायदा बांधकामे पाडण्‍याचा कांदोळी पंचायतीचा आदेश

Illegal Construction: अमरा बाय द सी (कळंगुट) आणि लॉयड सेंट ज्यूड ज्योकिम फर्नांडिस यांनी कळंगुट गावात केलेली बांधकामे पाडून टाकण्याचा आदेश कांदोळी पंचायतीने जारी केला आहे.

दैनिक गोमन्तक

Illegal Construction: अमरा बाय द सी (कळंगुट) आणि लॉयड सेंट ज्यूड ज्योकिम फर्नांडिस यांनी कळंगुट गावात केलेली बांधकामे पाडून टाकण्याचा आदेश कांदोळी पंचायतीने जारी केला आहे. ही बांधकामे सागरी अधिनियमानुसारच्या 200 मीटर ना विकास क्षेत्रात करण्यात आल्याची तक्रार गोवा फाऊंडेशनने केली होती.

सदर आदेशानुसार आठ कुटिरे, तरण तलाव, सुरक्षा केबिनसह रिसेप्शन ब्लॉक, सिमेंट फ्लोअरिंग, कुंपण आणि सांडपाणी होल्डिंग टाकी पाडावी लागणार आहे. यापूर्वी केलेल्या पाहणीत ही बांधकामे आढळली होती.

तत्पूर्वी, 3 मार्च 2023 रोजी गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने केलेल्या तपासणीवेळी गोवा फाऊंडेशनने सिद्ध केले होते की, काँक्रीट फाऊंडेशनसह आठ काँक्रीट संरचना या ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत.

प्रत्येकामध्ये सुमारे तीन-चार खोल्या आहेत. तसेच एक जलतरण तलाव, सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि इतर संरचना उभारणी आहे. प्रत्यक्षात गोवा किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने फक्त तात्पुरत्या लाकडी कुटिरांसाठी ना हरकत दाखला दिला होता.

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवाई आणि जल कायद्यांतर्गत संमतीसाठी अमरी बाय द सीचा अर्ज यापूर्वीच फेटाळला आहे. तत्पूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाच्या तपशीलवार आदेशानंतर परिसराचा सर्व ताबा निलंबित करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT