Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: फातोर्डा पोलिस निरीक्षक हाजीर हो!

Goa Police: पोलिस अधिकाऱ्याचा कुत्रा लष्करी अधिकाऱ्याला चावल्याप्रकरणी आता राज्य मानवाधिकार आयोगासमोर फातोर्ड्याच्या पोलिस निरीक्षकांना जबानी द्यावी लागणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Police: पोलिस अधिकाऱ्याचा कुत्रा लष्करी अधिकाऱ्याला चावल्याप्रकरणी आता राज्य मानवाधिकार आयोगासमोर फातोर्ड्याच्या पोलिस निरीक्षकांना जबानी द्यावी लागणार आहे. या प्रकरणी सर्व कागदपत्रे घेऊन फातोर्ड्याच्या पोलिस निरीक्षकाने 29 फेब्रुवारीला सकाळी साडेदहा वाजता उपस्थित राहावे, असा आदेश आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष डेस्मंड डिकॉस्ता यांनी जारी केला आहे.

कुत्रा चावण्याचा हा प्रकार ऑक्टोबर 2020 मधील आहे. लष्करामधील लेफ्टनंट कर्नल जीजस फुर्तादो यांनी 31 ऑक्टोबर 2020 रोजी फातोर्डा पोलिसात एक लेखी तक्रार दिली होती. त्यात त्यांनी म्हटले होते,

की ते सकाळी फिरण्यास ते गेले असता पोलिस अधीक्षक बॉसेट सिल्वा यांच्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना तीन जखमा झाल्या. या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर काही दखल न घेतल्याने त्यांनी याविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि राज्य सरकार यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या.

हा विषय राज्याच्या मुख्य सचिवांकडे पोहोचल्यानंतर त्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले. याविषयी तीनदा चौकशीही झाली, मात्र या कुत्रा चावल्या प्रकरणी कुत्र्याच्या मालकाचा दोष नसल्याचा चौकशीत निष्कर्ष काढण्यात आला होता.

म्हणून प्रकरण ‘मानवाधिकार’कडे

तक्रारदारांच्या मते सिल्वा हे चार कुत्र्यांसह जात होते. त्यापैकी दोन कुत्री त्यांनी मोकळी सोडली होती. कुत्र्याने हल्ला केला तेव्हा सिल्वा यांनी कुत्र्याला थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. कुत्र्याने हल्ला केल्यानंतर ते शांतपणे कुत्र्यासह पुढे निघून गेले. याप्रकरणी एफआयआर नोंदवल्यामुळे फुर्तादो यांना न्याय मागण्यासाठी बरीच धावाधाव गेल्या तीन वर्षात करावी लागली आहे. अखेर त्यांनी राज्य मानव अधिकार आयोगासमोर हा विषय नेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT