IMD Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update : हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी; मुसळधार पावसाची शक्यता

IMD Rain Update : दि. 12 आणि उद्या दि. 13 असे दोन दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. वादळी-वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

IMD Rain Update : गोव्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाने आपली हजेरी लावली आहे. यामध्ये अनेक ठिकाणी झाडांची पडझड सुद्धा झाली आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, आज दि. 12 आणि उद्या दि. 13 असे दोन दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. वादळी-वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. (IMD Rain Update)

दक्षिण गुजरात किनार्‍यापासून केरळच्या किनार्‍यापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गोव्यात पावसाचा जोर आणखी 2 दिवस सुरू राहणार आहे.

हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे. याचप्रमाणे मिळालेल्या माहितीनुसार, 14 जूनला सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे अपेक्षित आहे. मासेमारांना समुद्रात न जाण्याची सूचना देण्यात आली आहे.

दरम्यान, आज सकाळपासून पावसामुळे मोठं मोठी झाडे उन्मळून पडल्यामुळे पेडणे अग्निशामक दलाच्या जवानांची बरीच धावपळ झाली. एका बाजूने मोठा पाऊस व त्यात विजेची अत्याधुनिक सामुग्री व जीवाची भीतीचा याचा कसलाही दबाव न बाळगता जवानांनी मोठी कामगिरी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT