Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

प्रसाद गावकर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यास सांगे गटाचा विरोध

कामत यांची भेट घेणाऱ्यामध्ये अभिजित देसाई (Abhijit Desai) रजनीकांत नाईक (Rajinikanth Naik) व अन्य सदस्यांचा समावेश होता.

दैनिक गोमन्तक

मडगाव: सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर (Prasad Gavkar) याना काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यास सांगे (Sanguem) गट काँग्रेसने (Congress) विरोध केला असून आज या गट सदस्यांनी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांची भेट घेऊन आपले म्हणणे म्हणणे मांडले. सांगेविषयी कुठलाही निर्णय घेताना गट समितीला विश्वासात घ्यावे अशी मागणी केली.

कामत यांची भेट घेणाऱ्यामध्ये अभिजित देसाई (Abhijit Desai) रजनीकांत नाईक (Rajinikanth Naik) व अन्य सदस्यांचा समावेश होता. सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची तयारी केली आहे त्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली होती. या भेटीबद्दल बोलताना रजनीकांत नाईक यांनी , सांगेत काँग्रेसचा उमेदवार कोण असावा याचा निर्णय परस्पर न घेता काँग्रेस गटाला विश्वासात घेऊनच घ्यावा अशी मागणी केल्याचे सांगितले. यावेळी कामत यांनी या गटाच्या सदस्यांची काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्याशी भेट घालून देण्याचे त्यांना आश्वासन दिले. (Opposition to tell Prasad Gavkar to join Congress)

दरम्यान नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिजीत देसाई यांनी प्रसाद गावकर हे निष्क्रिय आमदार असल्याने लोक त्यांच्यावर नाराज आहेत. त्यांना काँग्रेसमध्ये घेऊन काहीच फायदा होणार नाही असे सांगितले. प्रसाद गावकर याना आता आपण अपक्ष म्हणून निवडून येऊ शकत नाही हे उमजून आलतामुळेच ते काँग्रेस पक्षात येऊ पाहतात असे सांगितले .

मागच्या जिल्हा पंचायत निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या विरोधात काम केले होते. या निवडणुकीत त्यांचे भाऊ उतरले होते. त्यानाही त्यांना निवडून आणता आले नाही. या उलट आपण एसटी बहुल या मतदारसंघात 3500 मते घेतली असे देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT