सरकारी माध्यमिक विद्यालयाचे (Government Secondary School) मुख्याध्यापक सुरज नाईक (Suraj Naik) यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी चांगल्याप्रकारे सहभाग घेतला. मुख्याध्यापक सूरज नाईक यांनी निवडक साठ विद्यार्थी व शिक्षकांचा एक गट मे महिन्यात बनवला. या गटाला मिनी कोवीड वाॅरीयर्स (Covid Warriors) असे नामांकरण केले.एकूण या गटाचा उद्देश काय नेमके या कोवीड पेंडमिक काळात नेमकं काय करायचं ते स्पष्ट केले.
यात विविध विषय घेण्यात आले होते त्यात विद्यार्थ्यांनी खालील कृतीतून प्रबोधन केले.यात कोवीड काळात आरोग्यवर्धक काढा करण्याची कृती दाखवणे,धूप घालून वातावरण शुद्ध करण्याची कृती करणे,लोकांना लसीकरणाचे (vaccination) महत्व पटवून सांगणे,पेंडामिक काळात घेण्यात येणाऱ्या विविध सुरक्षा नियमांची शिकवण देते, मुलांनी स्वलिखित कवितांचे सादरीकरण केले,मुलांच्या गटानी करोनाचे दुष्परिणाम व उपाय यावर गीत सादर केले,मुलांनी चित्राव्दारे,चित्रफितीव्दारे, रांगोळी,फलक लावून प्रबोधन केले, सार्वजनिक स्थानावर फलक लावून जागृती केली, गरजू लोकांना मास्क बनवून देणे,शिकवणे आदी उपक्रम मुलांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबवले.
हे सर्व उपक्रम करुन जो गट केला होता त्यावर घालत होते. मुलांनी केलेल्या या कार्याला अधिक हुरुप यासाठी यात उपक्रमात सहभागी झालेल्या साठ विद्यार्थ्यांपैकी उत्कृष्ठ अशी कामगीरी बजावलेल्या वीस विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांनी लसीकरणाची जाहिरात असलेल्या वीस जर्सी व इतर चाळीस विद्यार्थ्यांना मास्क देण्याचे जाहीर केले.
एकूण विद्यालयातर्फे आयोजित या मीनी कोविड वाॅरीयर्स उपक्रमाची माहिती मुख्याध्यापक सुरज नाईक यांनी शिक्षण संचालक दिलीप भगत, उपसंचालक शंभू घाडी, सहाय्यक संचालक मनोज सावईकर (Manoj Sawaikar) यांच्या पर्यंत पोहोचवली .शिक्षण संचालक दिलीप भगत यांनी या मीनी कोविड वाॅरीयर्स उपक्रमाची भरभरून कौतुक केले.
पर्वरी येथे शिक्षण संचालनालयात झालेल्या एका छोट्या कार्यक्रमात शिक्षण संचालक दिलीप भगत ,उपसंचालक शंभू घाडी ,सहाय्यक संचालक मनोज सावईकर यांच्या उपस्थितीत निवडक विद्यार्थ्यांना घेऊन या उपक्रमासाठी पुरस्कृत केलेल्या जर्सी चे अनावरण केले व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक सुरज नाईक, जेष्ठ शिक्षक दिलीप पालेकर, धाकटू नाईक शिक्षिका तेजस्विनी नाबर तसेच विद्यार्थ्यात कशीश नाईक,स्नेहा देसाई, विभूती विठू नाईक आदी विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिक्षण संचालक दिलीप भगत यांनी गुळेली विद्यालयाच्या या कोरोना काळातील उपक्रमाचे कौतुक केले.मुख्याध्यापक तसेच शिक्षकांनी अशा प्रकारच्या उपक्रमात विद्यार्थ्यांना सामावून घेतल्याबद्दल अभिनंदन केले व अशा प्रकारच्या उपक्रमाला आपले नेहमी सहकार्य लाभेल असे सांगितले.
या उपक्रमात एकूण साठ विद्यार्थी सहभागी झाले होते त्यातील उत्कृष्ट कामगीरी बजावलेले कशीश नाईक,स्नेहा नाईक, विभूती विठू नाईक,मधूरा देसाई,चंदन गावडे,तेजस्वी गावडे,रविना नाईक,तन्वी गावकर,वैष्णवी आयकर,महिमा म्हावळींगकर,शुभम म्हावळींगकर,अलिशा मेळेकर,दर्शना पार्सेकर,रक्षीता मोर्लेकर,पल्लवी मेळेकर, मिताली गावकर,स्नेहा गावकर,वैभवी आयकर,शुभदा नाईक,दिव्यंका गावडे आदी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली व मुख्याध्यापकांनी पुरस्कृत केलेल्या जर्सी त्यांना देण्यात येणारा आहे.
मुख्याध्यापक सुरज नाईक
याविषयी माहिती देताना मुख्याध्यापक सुरज नाईक म्हणाले की कोवीड महामारीरीचा काळ त्यात सुद्धा मुलांनी काही तरी घरच्या घरी राहून सहभाग घेता यावा यासाठी हा उपक्रम सुरू केला.यातून आपल्या आसपास मुलं जागृती करु शकेल अशी आशा होती किमान आपल्या कुटुंबापर्यंत तरी मुलं काही करतील असा आम्हाला विश्वास होता परंतु मुलांनी या पुढे जाऊन वेगवेगळ्या माध्यमातून कोवीड जागृती केली त्याबद्दल मुलांचा अभिमान आहे.
शिक्षण संचालक दिलीप भगत ,उपसंचालक शंभू घाडी ,सहाय्यक संचालक मनोज सावईकर यांच्या उपस्थितीत या उपक्रमासाठी पुरस्कृत केलेल्या जर्सी चे अनावरण व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करताना.यावेळी मुख्याध्यापक सुरज नाईक, जेष्ठ शिक्षक दिलीप पालेकर, धाकटू नाईक शिक्षिका तेजस्विनी नाबर तसेच विद्यार्थ्यात कशीश नाईक,स्नेहा देसाई, विभूती विठू नाईक आदी विद्यार्थी विद्यार्थी मीनी कोविड वाॅरीयर्स उपक्रमाद्वारे आपल्या शेजाऱ्यांना कोवीड संबंधित माहिती देताना.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.