land Acquisition  Dainik Gomantak
गोवा

land Acquisition : शेती, खाजन जमिनीत भूसंपादनाला विरोध ; पुलामुळे शेती नष्ट होण्याची भीती

land Acquisition लोटलीवासीयांकडून ‘पीडब्ल्यूडी’कडे हरकती सादर

गोमन्तक डिजिटल टीम

land Acquisition : पणजी, नव्या बोरीच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून खाजन व शेती जमिनीत भूसंपादन प्रक्रिया सुरू केल्याने त्याविरोधात लोटलीतील स्थानिकांनी मोठ्या संख्येने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हरकतीची निवेदने सादर केल्या.

या पुलामुळे सुमारे ७.५ लाख चौ.मी खाजन व शेतजमीन नष्ट होणार असल्याने ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. कृषी धोरणाद्वारे सरकार युवा पिढीला शेतीकडे वळण्याचे उपदेश करत, दुसरीकडे असलेल्या शेतजमिनी नष्ट करत असल्याने हरकती सादर केलेल्या लोकांनी संताप व्यक्त केला.

नव्या बोरी पुलाला लोटलीवासीयांचा विरोध नाही, मात्र ज्या जमिनीतून पुलासाठीचा रस्ता केला जाणार आहे, त्याला हरकत आहे. सरकारकडे दुसरा पर्याय आहे तो स्वीकारल्यास लोटली गावातील शेतजमीन व खाजन जमीन कमी प्रमाणात जाते त्यामुळे तो स्वीकारावा अशी विनंती शिरोडा मतदारसंघाच्या आमदारांना निवेदन देऊन करण्यात आली होती. पुन्हा आमदारांना

लोटलीवासीय भेटून ही भूसंपादन प्रक्रिया बंद करून उपलब्ध असलेल्या पर्यायी मार्गाची मागणी केली जाणार आहे.

यासंदर्भात सार्वजनिक बांधकामंत्री निलेश काब्राल म्हणाले की, भूसंपादन प्रक्रिया सुरू करून ज्यांच्या जमिनीतून नव्या पुलाचा रस्ता व पूल जात आहे त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांनी दाखल केलेल्या हरकती निवेदनावर चर्चा केली जाईल. ही फक्त सुरुवात आहे व पूल होण्यास अजून बराच वेळ आहे.

त्यामुळे लोकांनी अधिक घाबरण्याची गरज दिसत नाही. लोटलीवासियांनी ज्या प्रमाणात जमीन नष्ट होण्याची भीती व्यक्त केली आहे तेवढा परिणाम होणार नसल्याचे मत त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना व्यक्त केले.

१०० टन भातपिकावर पाणी सोडावे लागणार !

सार्वजनिक बांधकाम खात्याने या नव्या बोरी पुलासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करून संबंधित शेतजमीन मालकांना नोटिसा पाठवल्या आहेत. पुलासाठी ज्या जमिनींचे भूसंपादन केले जाणार आहे, त्या शेतजमीन मालकांना विश्‍वासात घेतले नाही व त्यावर चर्चाही केली नाही. सरळ नोटिसा पाठवून त्यावर मते मागवली आहेत.

या पुलासाठीचा रस्ता शेतजमीन व खाजन जमिनीतूत जात आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होणार आहे. दरवर्षी सुमारे ७.५ लाख चौ. मी. असलेल्या जमिनीतून येथील शेतकरी सुमारे १०० टन भातपिकाचे उत्पन्न घेतात. त्यावर पाणी सोडावे लागेल, असे मत हरकती सादर करण्यास आलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 22 July 2026: कुणाला धनलाभ, तर कुणाला मानसिक ताण! आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' राशींचे चमकणार तारे

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

SCROLL FOR NEXT