Goa Opposition Parties Protest Over Suspension of MPs 
गोवा

Goa Politics: भाजप हुकूमशहाप्रमाणे वागतेय; खासदारांच्या निलंबन विरोधात गोव्यातील विरोधी पक्षांचे निषेध आंदोलन

खासदार निलंबनावरुन गोव्यातील विरोधी पक्षांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

Pramod Yadav

Goa Opposition Parties Protest Over Suspension of MPs: संसदेचे हिवाळी अधिवेशन यावेळी विविध कारणांनी गाजले, मग ते सुरक्षा भंग प्रकरण असो की त्यानंतर झालेले खासदारांचे निलंबन. खासदार निलंबनावरुन गोव्यातील विरोधी पक्षांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

भाजप हुकूमशहाप्रमाणे वागत असल्याचा आरोप करत विरोधकांनी शुक्रवारी आझाद मैदानावर निषेध केला.

संसदेतील सुरक्षा भंग झाल्याप्रकरणी विरोधी पक्षातील नेत्यांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी केली.

गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आपचे गोवा प्रमुख अमित पालेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे गोवा प्रमुख जोस फिलिप डिसोझा, शिवसेना गोवा प्रमुख जितेश कामत आणि तृणमूल काँग्रेसचे नेते तनोज अडवलकर या आंदोलनात सहभागी झाले होते.

काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा आणि आल्तन डिकॉस्टा हेही यावेळी उपस्थित होते.

संसदेत योग्य मागणी करुन देखील खासदारांना निलंबित करण्यात आले, असे उपस्थितांना संबोधित करताना अमित पाटकर म्हणाले.

इंडिया आघाडीतील सर्व नेते यावेळी आंदोलनात सहभागी झाल्याचे पाटकर म्हणाले. भाजप विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, येत्या निवडणुकीत इंडिया आघाडी भाजपला सत्तेतून हद्दपार करेल असेही पाटकर म्हणाले.

भाजप लोकशाहीचा आनादर करत हुकूमशहाप्रमाणे वागत आहे, असे विरोधीपक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT