Goa Traffic Jam Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Jam: झुआरी पूल लोकांना सेल्फी काढण्यासाठी खुला केल्यानेच वाहतूक कोंडीत भर

विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड

Akshay Nirmale

Goa Traffic Jam: झुवारी पुलावर वाहतुकीची कोंडी होत असल्याने विरोधकांनी सरकारवर टीका सुरू केली असून सायंकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत नवीन झुआरी पुल लोकांना पाहण्यासाठी, भटकण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी राज्य सरकारने खुला ठेवल्याने या कोंडीत भर पडली आहे अशी टीका गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी केली आहे. इतरही विरोधी पक्षांनी पणजी-मडगाव ट्रॅफिक जॅमवरून राज्य सरकावर टीका केली आहे.

कामत म्हणाले की, सायंकाळी 5 ही सर्वसाधारणपे सर्व कार्यालये सुटण्याची वेळ असताना नेमक्या त्याचवेळी पुल लोकांना सेल्फी काढण्यास खुला ठेवण्याचा सल्ला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कुणी दिला हे कळत नाही. या पुलावर येणाऱ्या हौशी लोकांचे नियंत्रण करण्यासाठी योग्य प्रमाणात पोलिस बंदोबस्तही नव्हता. त्यामुळे वाहतुकीचा चार चार तास खोळंबा झाला. त्यात रुग्णवाहिकाही अडकल्या. आता तरी योग्य प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांनीही सरकारवर टीका करताना गोवा सरकारने हलगर्जीपणाचा कळस गाठला आहे अशी प्रतिक्रीया व्यक्त केली. एकीकडे आरोग्य मंत्री कोविडच्या भितीने गोवा वैद्यकिय महाविद्यालय इस्पितळात मॉक ड्रील घेतात तर दुसऱ्या बाजूने मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुलावर सेल्फी उत्सव साजरे करून वाहतुकीची अभूतपूर्व अशी कोंडी होऊ देतात, अशी टीका पाटकर यांनी ट्विटद्वारे केली आहे.

तृणमल काँग्रेसच्या नेत्या राखी नाईक यांनी झुआरी पुलावर होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीत रुग्णवाहिका अडकून पडल्यावरून टीका केली आहे. सध्या केंद्रीय मंत्र्यांना वेळ मिळत नाही म्हणून नवीन पुलाचे उद्घाटन लांबणीवर टाकले आहे, तरीही रुग्णांच्या जीवाची पर्वा करीत निदान पुलाचे उद्घाटन होण्यापूर्वी किमान रुग्णवाहिका तरी या नवीन पुलावरून सोडावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT