CM Pramod Sawant: विरोधी आमदारांचे वर्तन हाच लोकशाहीसमोरचा सर्वात मोठा धोका

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विरोधी आमदारांवर पलटवार
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant: विरोधी पक्षातील आमदारांचे वर्तन हाच लोकशाहीसमोर असलेला सर्वात मोठा धोका आहे, असा पलटवार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील विरोधी पक्षातील आमदारांवर केला आहे. विरोधी आमदार आणि विधानसभा सभापती रमेश तवडकर यांच्यातील संघर्षावर मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून आपली भुमिका मांडली आहे.

CM Pramod Sawant
Nilesh Cabral: पाणी बिल थकबाकीदारांसाठी वन टाईम सेटलमेंट ऑनलाईन योजना 1 जानेवारीपासून

मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, गोव्यातील विरोधी पक्षांतील आमदारांचे वर्तन हाच लोकशाहीसमोरील सर्वात मोठा धोका आहे. आमदारांनी विधानसभा सभापतींबाबत असभ्य वक्तव्य केले आहे. विरोधी पक्षांकडे कोणताच मुद्दा राहिलेला नाही त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे खऱ्या मुद्यांवर लक्ष न देता ते राजकीय लाभासाठी अशापद्धतीने प्रसारमाध्यमात हेडलाईन होतील, अशा गोष्टींकडे जास्त लक्ष देत आहेत.

गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 16 ते 19 जानेवारी असे पाच दिवस चालणार आहे. हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर झाल्यापासून विरोधी पक्षातील आमदारांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, असा रेटा लावला आहे. त्यावरून सरकारवर टीकाही केली जात आहे. याच क्रमात सर्व विरोधी आमदारांनी विधानसभा सभापती रमेश तवडकर यांची भेट मागितली होती. तवडकर यांनीही अपॉईंटमेंट दिली होती.

CM Pramod Sawant
Goa Traffic Jam: पणजी-मडगाव मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; सकाळपासून वाहनांच्या रांगा, रूग्णवाहिकाही अडकली...

तथापि, गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी तवडकर हे मुख्यमंत्र्यांचे नोकर आहेत, असे वक्तव्य केले. त्यामुळे हा सभापतीपदाचा अपमान असल्याचे सांगत जोपर्यंत आमदार सरदेसाई माफी मागत नाहीत तोपर्यंत विरोधी पक्षातील आमदारांना भेटणार नाही, अशी भुमिका सभापती तवडकर यांनी घेतली.

त्यावर विरोधी पक्षातील आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन ही लोकशाहीची हत्या असल्याची टीका केली. तसेच आमदारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात सभापती अपयशी ठरल्याची टीका केली. तर आमदार विजय सरदेसाई यांनी अधिवेशनाचा कालावधी 15 दिवसांनी वाढवा लगेच माफी मागतो, असे प्रत्युत्तर दिले. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com