Yuri Alemao | Goa Government  Dainik Gomantak
गोवा

हणजूण CRZ उल्लंघन प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भूमिका ही निवडणुकीत भाजपविरोधी जनप्रक्षोभ टाळण्याची युक्ती; आलेमाव यांचा टोला

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुप्रीम कोर्टात स्पेशल लिव्ह पिटीशन दाखल करण्याची केलेली घोषणा म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपविरोधी जनप्रक्षोभ टाळण्याची युक्ती आहे.

दैनिक गोमन्तक

Yuri Alemao Slams CM Pramod Sawant

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुप्रीम कोर्टात स्पेशल लिव्ह पिटीशन दाखल करण्याची केलेली घोषणा म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपविरोधी जनप्रक्षोभ टाळण्याची युक्ती आहे. सीआरझेड नियमांमुळे अडचणीत आलेल्यांसाठी सरकारने कायमस्वरुपी वैधानिक उपाय काढण्याची गरज आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

स्थानिक पंचायत आणि पंचायत सचिवांनी हणजूण-वागातोर सिआरझेड उल्लंघन प्रकरणी उच्च न्यायालयासमोर चुकीची भूमिका मांडल्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वक्तव्यावर सडकून टीका करत, युरी आलेमाव यांनी गोव्याचे महाधिवक्ता म्हणजे एडव्होकेट जनरल काय करत होते? असा खडा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला आहे.

पंचायत, नगरपालिका आणि इतर सरकारी विभागांना सल्ला देणे आणि मार्गदर्शन करणे ही एडव्होकेट जनरल म्हणजे महाधिवक्ता यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कायदेशीर कक्षाची जबाबदारी आहे. हणजूण-वागातोर प्रकरणांवरून सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी बोध घेणे गरजेचे आहे.

भाजप सरकार अधिकाऱ्यांकडून सोयिस्कर कामे करुन घेते आणि वाद उफाळून आला तर त्याचे सर्व खापर सरकारी अधिकाऱ्यांवरच फोडते हे आता उघड झाले आहे. सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राजकारण्यांच्या दबावाखाली न येता केवळ कायदेशीर गोष्टीच कराव्यात असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एसएलपीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे परिणाम काय होतील याचे मूल्यमापन न करता घाईघाईने विधान केल्याचे दिसून येते. मी सरकारला सावध करू इच्छितो की एसएलपीमुळे पुढे गुंतागुंत होणार नाही याचा योग्य व सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. सध्याच्या स्वरूपातील सीआरझेड कायदा गोव्यातील उपजीविकेवर परिणाम करत आहे हे गोवा सरकारने केंद्र सरकारला पटवून द्यायला हवे असे युरी आलेमाव म्हणाले.

राज्यात गेली बारा वर्षे भाजपची सत्ता आहे. गेली दहा वर्षे केंद्रात भाजप सरकार आहे. दुर्दैवाने, तथाकथित डबल इंजिन सरकार गोवा आणि गोव्यातील पारंपारिक व्यवसायांसंबंधीचे प्रश्न सोडवू शकले नाही, असा टोला युरी आलेमाव यांनी हाणला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT