Yuri Alemao  Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: भाजप सरकार अपयशी! गोव्याला दलाल संस्कृती, गुन्ह्यांचे केंद्र बनवले; आलेमाव यांचा घणाघात

Goa Politics: राज्यात महिलांवरील वाढते गुन्हे ही चिंताजनक बाब आहे. गुन्हेगारांना कायद्याची भीतीच नाही. त्यामुळेच गुन्हे वाढत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Yuri Alemaow Accuses BJP Government of Failing to Curb Crimes

पणजी: राज्यात महिलांवरील वाढते गुन्हे ही चिंताजनक बाब आहे. गुन्हेगारांना कायद्याची भीतीच नाही. त्यामुळेच गुन्हे वाढत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.

आलेमाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कळंगुटमध्ये काही व्यक्तींनी स्थानिक महिलेबद्दल अश्लील टिप्पणी केल्याची घटना घडली. ही घटना सर्व काही दर्शवत आहे आणि गुन्हेगारांना आता खाकी वर्दीची भीती राहिलेली नाही, हेही स्पष्ट होते. पर्यटक स्थानिक महिलांबद्दल अश्लील कमेंट करत आहेत, हे घृणास्पद आहे. वेश्याव्यवसायाला आळा घालण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे, असे आलेमाव यांनी नमूद केले आहे.

‘कळंगुट ‘रेड लाईट एरिया?’

दोन वर्षांपूर्वी कळंगुट आणि बागा येथील सुमारे ५०० लोकांनी दलालांच्या वेश्याव्यवसाय आणि दादागिरीविरोधात आंदोलन केले होते. तेव्हा काही स्थानिक महिलांनी सायंकाळी घराबाहेर पडणे धोक्याचे असल्याची भीती व्यक्त केली होती. किनारपट्टी आणि इतर भागात वेश्याव्यवसाय सुरू असल्याने पर्यटकांना हा परिसर ‘रेड लाईट एरिया’ वाटू लागला आहे. भाजप सरकार गोव्याला वेश्याव्यवसाय, दलाल संस्कृती, दादागिरी आणि गुन्ह्यांचे केंद्र बनवत आहे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar: 'माझे घर'चे अर्ज सोमवारपासून उपलब्ध; योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा, CM प्रमोद सावंतांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Goa Teacher Recruitment: 'टीईटी'अभावी शिक्षक उमेदवारांची जाणार संधी, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे 'प्रमाणपत्र' सादर करणे अनिवार्य

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

SCROLL FOR NEXT