Vijai Sardesai news Dainik Gomantak
गोवा

Goa ZP Election: "युतीचा निर्णय झाला पण..." सरदेसाईंनी मांडली पराभवाची कारणे; '2027'साठी नव्या रणनीतीचे संकेत

Vijai Sardesai Statement: जिल्हा पंचायत निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्यानंतर गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी आत्मचिंतनाची गरज व्यक्त केली

Akshata Chhatre

मडगाव: जिल्हा पंचायत निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्यानंतर गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी आत्मचिंतनाची गरज व्यक्त केली. "काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डची युती निवडणुकीच्या अगदी तोंडावर झाल्यामुळे ती तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत आणि नेत्यांपर्यंत पोहोचू शकली नाही," अशी कबुली त्यांनी दिली. किमान चार जागांची अपेक्षा असताना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केलीये.

आकडेवारी आणि निसटता पराभव

विजय सरदेसाई यांनी माहिती दिली की, गोवा फॉरवर्डने ९ जागा लढवल्या आणि ३०,५०० मते मिळवली, जी एकूण मतदानाच्या २७ टक्के आहेत. एका जागेवर तर पक्षाचा उमेदवार केवळ १९ मतांच्या निसटत्या फरकाने पराभूत झाला. सासष्टी तालुक्यातील निकालांवर समाधान व्यक्त करताना ते म्हणाले की, "सासष्टीतील जनतेने भाजपला नाकारता येते हे दाखवून दिले, मात्र उर्वरित गोव्यात मतदारांची मानसिकता वेगळी असल्याचे दिसून आले."

कार्यकर्त्यांवर आणि बंडखोरांवर आरोप

युती असूनही काही मतदारसंघांमध्ये मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले नसल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला. "राय मतदारसंघात पीसीसी (PCC) सदस्यांनी उघडपणे गोवा फॉरवर्डच्या उमेदवाराविरोधात काम केले. काणकोणमध्ये बंडखोर उमेदवाराने १,२०० मते घेतल्याने पक्षाला फटका बसला, तर कुंभारजुवे येथे मतांच्या विभाजनामुळे पराभव झाला," असे त्यांनी स्पष्ट केले.

२०२७ साठी धडा

या निकालांमधून बरेच काही शिकण्यासारखे असल्याचे सांगत सरदेसाई म्हणाले की, जर ही युती सहा महिने आधी झाली असती, तर दक्षिण गोव्यातील चित्र पूर्णपणे वेगळे असते. आता सर्व मित्रपक्षांनी एकत्र बसून २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी ठोस रणनीती आखण्याची वेळ आली आहे. झालेल्या चुका सुधारून भविष्यात अधिक प्रभावीपणे सामोरे जाण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BCCI Central Contract: बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक! रोहित-विराटचं 'डिमोशन' तर शुभमन गिलचं टॉपचं प्रमोशन; सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर

India vs Pakistan: क्रीडाविश्वात हाय-व्होल्टेज ड्रामा! भारत-पाक महामुकाबल्यावर बहिष्काराचं सावट; आयसीसीनं धुडकावल्या मोहसीन नक्वीच्या मागण्या

Nerul: सफर गोव्याची! 400 वर्षांपूर्वी दैवत हलवून मांद्रे येथे सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले; भक्तीरसातले 'नेरुळ'

Esakal: विश्वासार्हतेचा विजय! मराठी मनाचा मानबिंदू आता डिजिटलचाही 'राजा'; 5.6 कोटी युजर्ससह ई-सकाळ नंबर-1

Surya Grahan 2026: यंदाची महाशिवरात्री ठरणार 'टर्निंग पॉईंट'! सूर्यग्रहण कोणासाठी शुभ-अशुभ? 'या' 4 राशींच्या अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT