Murdi Khandepar Villagers Protest At Panjim Dainik Gomantak
गोवा

Murdi Khandepar News: मुर्डी-खांडेपारवासीयांचे पणजीत धरणे; कलम शिथिल

Murdi Khandepar News: जिल्हाधिकाऱ्यांकडून चतुर्थीसाठी मोकळीक

दैनिक गोमन्तक

Murdi Khandepar News: मुर्डी - खांडेपार येथे सरकारने लागू केलेला जमावबंदीचा (कलम 144) आदेश तत्काळ मागे घ्यावा, तसेच तेथील बंधारा प्रकल्पाचे काम बंद करण्याच्या मागणीसाठी आज खांडेपारवासीयांनी येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले.

त्यानंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी हे कलम अंशत: शिथिल केले. मात्र, त्यावर समाधान न झाल्याने आंदोलक हे कलम पूर्णत: मागे घ्या, या आपल्या मागणीवर ठाम राहिले.

अनुसूचित जमातीच्या (एसटी) लोकांवर सरकारने जाणीवपूर्वक अन्याय केला आहे. जमावबंदी आदेश मागे न घेतल्यास ऐन गणेश चतुर्थीच्या काळात एसटी आयोगाचे कार्यालय तसेच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा आज खांडेपारवासीयांनी दिला.

खांडेपार येथील बंधारा प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असूनही तेथे येणाऱ्या काही व्यावसायिक व मेगा प्रकल्पांच्या फायद्यासाठी हा बंधारा उभारण्यात येत आहे. या बंधाऱ्यामुळे स्थानिकांच्या उपजीविकेचे साधन नष्ट होणार आहे.

दोन वर्षांपूर्वी खांडेपार येथे पूर आला होता. तेव्हा तेथील अनेक घरे वाहून गेली होती. त्यावेळी सरकारने मदतीचे आश्‍वासन देऊन काहीच केले नाही.

१४४ कलम अंशतः शिथिल

दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी एक आदेश जारी करून मुर्डी-खांडेपार येथे लागू केलेले १४४ कलम शिथिल केले. सरकारी कर्मचाऱ्यांना हे कलम लागू होणार नाही.

शिवाय लग्नसोहळा, अंत्ययात्रा, तसेच इतर सण-समारंभ हे या कलमामधून वगळण्यात आले आहेत.

सणासुदीत निर्बंध नकोच!

गणेश चतुर्थी चार दिवसांवर आली असताना सरकारने खांडेपार येथे कलम १४४ लावून लोकांवर अन्याय केला आहे. या आदेशामुळे स्थानिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामसभेत विरोध केला असला तरी सरकार हा प्रकल्प स्थानिकांवर लादत आहे.

लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी हा बंधारा बांधण्यात येत असून सरकार दिशाभूल करत आहे, अशी टीका माजी सरपंच श्रावणी गावडे यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT